शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयातून घरी जात असताना भाजपा नेत्यावर गोळीबार; भररस्त्यात मृत्यू, बिहारमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 13:11 IST

रात्रीच्या वेळी भररस्त्यात भाजपा नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

नवी दिल्ली : रात्रीच्या वेळी भररस्त्यात भाजपा नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बिहारमधील या धक्कादायक घटनेने अनेकांचे लक्ष वेधले. बिहारमधील सिवानमध्ये भाजपा नेत्याच्या हत्येने स्थानिक राजकारण तापल्याचे दिसते. रात्री कार्यालयातून घरी परतत असताना भाजपा नेत्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा एक नातेवाईकही जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबाराजा मोठा आवाज ऐकताच स्थानिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पण, दुर्दैवाने भाजपा जिल्हाध्यक्षाचा जागीच मृत्यू झाला. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास भाजपाचे प्रभाग अध्यक्ष शिवाजी तिवारी हे कार्यालयातून घरी परतत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मेहुणा देखील दुचाकीवर बसला होता. अशातच भररस्त्यात दुचाकीवरून काही हल्लेखोर घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. एक गोळी मृत नेत्याच्या मेहुण्याला लागली असून तो गंभीर जखमी आहे.

 भाजपा नेत्यावर गोळीबारदरम्यान, हत्येच्या या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. सिवानचे पोलीस अधिखारी फिरोज आलम आणि निरीक्षक सुदर्शन रामही घटनास्थळी पोहोचले. लक्षणीय बाब म्हणजे मृत भाजपा नेत्याच्या घरात याआधी ऑगस्टपासून तीन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंब आधीच असह्य होते.

भररस्त्यात मृत्यू आपल्या सहकाऱ्याच्या हत्येनंतर स्थानिक भाजपा नेत्यांनी शोक व्यक्त केला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय पांडे यांनी शिवाजी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. "शिवाजी हे भाजपाचे अत्यंत सक्रिय कार्यकर्ते होते", अशा प्रतिक्रिया भाजपा नेते देत आहेत. या हत्याकांडानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. अज्ञात मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांना पकडण्यासाठी पोलीस शहरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. 

टॅग्स :BiharबिहारBJPभाजपाPoliticsराजकारणDeathमृत्यू