शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

एकत्र आत्महत्या करण्याचा इरादा पण ऐनवेळी प्रेयसीची माघार, प्रियकराची उडी अन् मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 15:36 IST

अनेकांनी आपल्या प्रेमासाठी जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत.

प्रेम आंधळं असतं... प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही, असं नेहमी बोललं जातं. अनेकांनी आपल्या प्रेमासाठी जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच राजस्थानमधील बालोत्रा ​​येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे आत्महत्या करण्याच्या इराद्याने रेल्वे स्टेशनवर पोहचलेल्या प्रेमी युगुलातील तरूणीनं ऐनवेळी माघार घेतली पण तरूणाला आपला जीव गमवावा लागला. 

३४ वर्षीय प्रियकरानं रेल्वे येताच उडी मारली अन् जीवन संपवलं. मात्र, त्याच्या प्रेयसीनं अखेरच्या क्षणी तिचा निर्णय बदलला आणि माघार घेतली. खरं तर मृत प्रियकराला २ मुलं देखील आहेत. ही घटना गुरुवारी रात्री राजस्थानमधील बालोत्रा ​​जिल्ह्यातील पाचपदरा पोलीस स्टेशन परिसरात घडली.  

प्रियकराची उडी अन् मृत्यू  राजू भट्ट असं मृताचं नाव असून तो मजुरी करून उदरनिर्वाह करायचा. राजू विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत. या घटनेनंतर राजूच्या कुटुंबीयांनी त्याची प्रेयसी रवीना (२०) आणि तिच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप केला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. एकाच गावात राहणारे राजू आणि रवीना यांच्यात मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. 

दरम्यान, लग्न होत नसल्याने राजू आणि रवीना यांच्यात वाद झाला आणि त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. दोघेही जवळच्या रेल्वे स्टेशनजवळ पोहचले. पण वेगवान ट्रेन आल्यावर ट्रेनचा वेग पाहून रवीना घाबरून मागे सरकली, मात्र तोपर्यंत राजूनं तिच्यासमोर उडी मारली होती. त्यानंतर रेल्वे गार्ड आणि स्टेशनच्या इतर कर्मचाऱ्यांनी राजूचा मृतदेह बालोत्रा ​​स्थानकात आणला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून राजूचा मृतदेह रुग्णालयात नेला.

कुटुंबीयांचा गंभीर आरोप राजूच्या कुटुंबीयांनी मृतदेह घेण्यास नकार देत प्रेयसी रवीना आणि तिच्या कुटुंबीयांच्या अटकेची मागणी केली. याआधी देखील राजूला जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा आरोप मृताच्या भावाने केला. महिलेच्या कुटुंबीयांनी राजूचा खून केला आणि त्याचा मृत्यू आत्महत्या करून झाला असं भासवण्यासाठी त्याचा मृतदेह ट्रॅकवर ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, राजूचं १५ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं आणि त्याला आठ आणि पाच वर्षांची दोन मुलं आहेत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टDeathमृत्यू