अझिथ्रोमायसिन, आयब्रुफेनसह ९०० औषधे महाग, गंभीर स्वरूपाचा संसर्ग; हृदयरोग, मधुमेह आदी विकारांवरील गोळ्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 11:10 IST2025-04-02T11:09:16+5:302025-04-02T11:10:15+5:30

Health News: ९००हून अधिक आवश्यक औषधांच्या किमतीत मंगळवारपासून (दि. १) १.७४ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटीने (एनपीपीए) हा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये गंभीर स्वरूपाचा संसर्ग, हृदयरोग, मधुमेह आदी विकारांवरील औषधांचा समावेश आहे.

900 medicines including Azithromycin, Ibuprofen, expensive, serious infections; including pills for heart disease, diabetes etc. | अझिथ्रोमायसिन, आयब्रुफेनसह ९०० औषधे महाग, गंभीर स्वरूपाचा संसर्ग; हृदयरोग, मधुमेह आदी विकारांवरील गोळ्यांचा समावेश

अझिथ्रोमायसिन, आयब्रुफेनसह ९०० औषधे महाग, गंभीर स्वरूपाचा संसर्ग; हृदयरोग, मधुमेह आदी विकारांवरील गोळ्यांचा समावेश

 नवी दिल्ली -  ९००हून अधिक आवश्यक औषधांच्या किमतीत मंगळवारपासून (दि. १) १.७४ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटीने (एनपीपीए) हा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये गंभीर स्वरूपाचा संसर्ग, हृदयरोग, मधुमेह आदी विकारांवरील औषधांचा समावेश आहे. अझिथ्रोमायसीन, आयब्रुफेन आदी औषधांच्या किमती वाढल्या आहेत.

औषधे (किंमत नियंत्रण) आदेश, २०१३ मधील तरतुदींनुसार अनुसूचित औषधांच्या कमाल किमतींचे वार्षिक पुनर्निर्धारण घाऊक किंमत निर्देशांकाच्या आधारे केले जाते. त्यानुसार वर्ष २०२४-२५ साठी अनुसूचित औषधांच्या कमाल किमती, घाऊक किंमत निर्देशांकातील वार्षिक बदलाच्या आधारे दि. १ एप्रिल, २०२४ पासून ०.००५५१ टक्क्याने वाढविण्यात आल्या होत्या. एनपीपीए नवीन औषधांच्या किरकोळ विक्रीच्या किमतीदेखील ठरवते असे केंद्रीय रसायने व खत या खात्याच्या मंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत नुकतेच सांगितले. 

एनएनपीएने म्हटले आहे की, २०२४मध्ये घाऊक मूल्य निर्देशांकामध्ये १.७४०२८ टक्के इतका बदल आहे. केंद्रीय रसायने, खते खात्याच्या अख्यत्यारीत असलेली एनपीपीए ही संघटना दरवर्षी आवश्यक औषधांचे घाऊक मूल्य निर्देशांकाच्या आधारे पुनरावलोकन करते. ही औषधे नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शिअल मेडिसिन या यादीत समाविष्ट केलेली असतात. 

कोणती औषधे महाग?
अझिथ्रोमायसिन या ॲण्टिबायोटिक औषधाची २५० मिलिग्रॅम व ५०० मिलिग्रॅम गोळ्यांच्या पाकिटाची कमाल किंमत अनुक्रमे ११.८७ रुपये आणि २३.९८ रुपये असणार आहे.  
ॲमॉक्सिसिलिन व क्लॅवुलॅनिक ॲसिड या असलेल्या ड्राय सिरपची किंमत २.०९ प्रतिमिली असेल.
डायक्लोफेनेक (वेदनाशामक औषध) : प्रत्येक गोळीची किंमत २.०९ रुपये)
आयब्रुफेन (वेदनाशामक औषध)
२०० मिग्रॅ : प्रतिगोळीसाठी ०.७२ रुपये 
४०० मिग्रॅ : प्रतिगोळीसाठी १.२२ रुपये
मधुमेह औषध (डॅपाग्लिफ्लोजिन   मेटफॉर्मिन हायड्रोक्लोराइड   ग्लिमेपिराइड) : प्रतिगोळीसाठी १२.७४ रुपये
ॲसिक्लोव्हिर (प्रतिजैविक)
२०० मिग्रॅ : प्रतिगोळीसाठी ७.७४ रुपये
४०० मिग्रॅ : प्रतिगोळीसाठी १३.९० रुपये
हायड्रोक्सीक्लोरोक्विन (ॲण्टिमलेरियल): 
२०० मिग्रॅ : प्रतिगोळीसाठी ६.४७ रुपये 
४०० मिग्रॅ : प्रतिगोळीसाठी १४.०४ रुपये

Web Title: 900 medicines including Azithromycin, Ibuprofen, expensive, serious infections; including pills for heart disease, diabetes etc.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.