बस ओढ्यात कोसळून ९ जण ठार, १२ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 11:30 IST2021-12-16T11:29:48+5:302021-12-16T11:30:04+5:30

पुलावर विरुद्ध दिशेने येत असलेली लॉरी चुकवण्याचा प्रयत्न बसचालकाने करूनही बस ओढ्यात पडली.

9 killed 12 injured as bus plunges into river andhra pradesh amravati | बस ओढ्यात कोसळून ९ जण ठार, १२ जखमी

बस ओढ्यात कोसळून ९ जण ठार, १२ जखमी

अमरावती (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेश राज्य परिहवन महामंडळाची बस ओढ्यात पडून चालकासह ९ जण मरण पावले, तर १२ जण जखमी झाले. मृतांत ५ महिला आहेत. ही दुर्घटना बुधवारी पश्चिम गोदावरी जिल्ह्यात जगनरेड्डीगुडेमजवळ घडली. जखमींना जगनरेड्डीगुडेममधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर एका गंभीरजखमी प्रवाशाला एलुरूत सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पुलावर विरुद्ध दिशेने येत असलेली लॉरी चुकवण्याचा प्रयत्न बसचालकाने करूनही बस ओढ्यात पडली.
 
स्थानिक धावले
बसवाहक आणि इतर प्रवासी यातून वाचले. ते किरकोळ जखमी झाले, असे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले. बसमध्ये ४५ प्रवासी व दोन कर्मचारी होते. काही प्रवाशांनी बसच्या खिडक्यांतून स्वत:ची सुटका करून घेतली, तर घटनास्थळी धावलेल्या स्थानिक रहिवाशांनी काही जणांना खिडक्यातून ओढून काढले.

Web Title: 9 killed 12 injured as bus plunges into river andhra pradesh amravati