ईपीएफवर ८.७ टक्के व्याज

By Admin | Updated: April 26, 2016 05:32 IST2016-04-26T05:32:18+5:302016-04-26T05:32:18+5:30

अर्थ मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षात २०१५-१६ साठी ईपीएफवर ८.७ टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय न्यास बोर्डाने या जमा रकमेवर ८.८ टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव दिला होता.

8.7% interest on EPF | ईपीएफवर ८.७ टक्के व्याज

ईपीएफवर ८.७ टक्के व्याज

नवी दिल्ली : अर्थ मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षात २०१५-१६ साठी ईपीएफवर ८.७ टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय न्यास बोर्डाने या जमा रकमेवर ८.८ टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव दिला होता.
कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी लोकसभेत सांगितले की, केंद्रीय न्यास बोर्डाने फेब्रुवारीत झालेल्या बैठकीनंतर चालू आर्थिक वर्षात ईपीएफसाठी ८.८ टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव दिला होता. तथापि, अर्थमंत्रालयाने ८.७ टक्के व्याज देण्याला मंजुरी दिली आहे. बहुधा ही पहिलीच वेळ आहे की, अर्थ मंत्रालयाने सीबीटीच्या प्रस्तावापेक्षा कमी व्याजदर मंंजूर केला आहे. ईपीएफओने २०१३ -१४ आणि २०१४-१५ मध्ये ८.७५ टक्के व्याज दिले होते. वर्ष २०१२-१३ मध्ये ८.५ टक्के, तर २०११-१२ मध्ये ८.२५ टक्के व्याज दिले होते. ईपीएफओच्या सप्टेंबरच्या अंदाजानुसार असे सांगण्यात आले होते की, २०१५-१६ साठी ८.९५ टक्के व्याज देता येईल. कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी सीबीटीच्या १६ फेब्रुवारीच्या बैठकीत चालू वर्षासाठी ९ टक्के व्याजदराची मागणी केली होती; पण सीबीटीने ८.८ टक्के व्याजदराला सहमती दर्शविली होती.

Web Title: 8.7% interest on EPF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.