शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

देशात 86.42 लाखांवर झाले कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 3:19 AM

९३.७२ टक्के प्रमाण; मृत्यूदर अवघा १.४७ टक्के

नवी  दिल्ली :  देशात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८६.४२ लाखांवर पोहोचली असून त्यांचे प्रमाण ९३.७२ टक्के आहे. एकूण रुग्णांची संख्या ९२ लाखांपेक्षा अधिक तर कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.४७ टक्के व सक्रिय रुग्णांची संख्या पाच लाखांहून कमी आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी  ४४,३७६ नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या ९२,२२,२१६ तर बरे झालेल्यांचा आकडा ८६,४२,७७१ आहे. या आजाराने आणखी ४८१ जण मरण पावले असून बळींची एकूण संख्या १,३४,६९९ झाली आहे. सलग १५व्या दिवशी सक्रिय रुग्णांची संख्या ५ लाखांपेक्षा कमी म्हणजे ४,४४,७४६ आहे. अमेरिकेमध्ये १ कोटी २९ लाख कोरोना रुग्ण आहेत.

युरोपमधील नागरिकांनी दक्षता घ्यावीकोरोनाच्या साथीची दुसरी लाट आलेल्या युरोपला पुढच्या सहा महिन्यांत खडतर स्थितीचा सामना करावा लागेल असे जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोप विभागाचे संचालक हान्स क्लूग यांनी सांगितले. नागरिकांनी नीट दक्षता न घेतल्यास साथीचे संकट आणखी गडद होऊ शकते असेही ते म्हणाले.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या माहितीनुसार देशात २४ नोव्हेंबरपर्यंत १३.४८ कोटी नमुन्यांची चाचणी कोरोनासाठी करण्यात आली होती. या चाचण्यांत मंगळवारी झालेल्या ११,५९,०३२ चाचण्यांचाही समावेश आहे. आरोग्य मंत्रालयच्या माहितीनुसार ७० टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यू हे रुग्णाच्या आरोग्यातील गुंतागुंत किंवा एकापेक्षा जास्त आजारांमुळे झाले आहेत.

६ कोटी १ लाखांवर जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या

४ कोटी १५ लाख रुग्ण कोरानामुक्त झाले

१४ लाख १५ हजार लोकांचा कोरानामुळे बळी गेला

१ कोटी २९ लाख कोरोनारुग्ण अमेरिकेत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत