शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
5
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
6
कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
7
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
8
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
9
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
10
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
11
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
12
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
13
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
14
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
16
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
17
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
18
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
19
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
20
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल

दिल्लीतील हिंसक आंदोलनात ८३ पोलीस जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 22:51 IST

Farmer Protest : आज कृषी कायद्यांना विरोध करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागून झालेल्या दंग्यामध्ये सुमारे ८३ पोलीस जखमी झाले आहेत.

नवी दिल्ली - आज कृषी कायद्यांना विरोध करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागून झालेल्या दंग्यामध्ये सुमारे ८३ पोलीस जखमी झाले आहेत. यापैकी अनेक पोलिसांना गंभीर दुखापती झाल्या असून, त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.दिल्लीपोलिसांचे जॉईंट कमिश्नर आलोक कुमार यांनी सांगितले की, अ‍ॅडिशनल (ईस्ट) डीसीपी मंजीत यांच्यावर ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षा दलांनी प्रसंगावधान राखून त्यांना वाचवले. अन्यथा मोठा अपघात झाला असता. याशिवाय अन्य एका पोलीस अधिकाऱ्याला दुखापत झाली आहे. तसेच अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यापूर्वी आंदोलनकर्ते शेतकरी आयटीओमध्ये पोहोचले आणि लुटियन्स भागात पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला.आंदोलनकर्त्यांनी ट्रॅक्टर परेडच्या निर्धारित वेळेच्या आधीच दिल्लीच्या सीमांमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली. तसेच रॅलीची परवानगी नसतानाही दिल्ली आयटीओपर्यंत धडक दिली.दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना राजपथावरील प्रजासत्ताक दिनाचे संचलन सुरू झाल्यानंतर निर्धारीत मार्गावरूनच परेड करता येईल या अटीसह ट्रॅक्टर परेडची परवानगी दिली होती.दरम्यान, ट्रॅक्टर मार्चला सुरुवात झाल्यानंतर काही आंदोलकांनी थेट लाल किल्ल्यापर्यंत धडक मारली. तसेच लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकवला. दरम्यान, दिल्लीत आज उसळलेल्या हिंसे प्रकरणी काही एफआयआरची नोंद झाली आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीdelhiदिल्लीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी