शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

चीनकडून स्टीलची ८०० टक्के आयात, दरात ४० टक्के वाढ; मागणीच्या तुलनेत देशांतर्गत उपलब्धता घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 3:23 AM

 चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत भारताकडून स्टील निर्यातीत तब्बल १४८ टक्के वाढ झाल्याचे निरीक्षण स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडियाने नोंदविले आहे. एकीकडे निर्यात वाढत असताना, देशांतर्गत पुरवठा व मागणी यातील तफावतीमुळे दरात मोठी वाढ होत आहे. 

अविनाश कोळी -सांगली : देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी वेगाने वाढत असल्याने स्टील उद्योगात सध्या चांगले वातावरण निर्माण झाले आहे. भारतातील मालाला अन्य देशांमधून विशेषत: चीनमधून मागणी वाढली आहे. देशातील उद्योजकांकडूनही या मागणीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जात आहे. २०१९-२० च्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात भारताकडूनचीनने आठपट अधिक स्टील खरेदी केले आहे.  चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत भारताकडून स्टील निर्यातीत तब्बल १४८ टक्के वाढ झाल्याचे निरीक्षण स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडियाने नोंदविले आहे. एकीकडे निर्यात वाढत असताना, देशांतर्गत पुरवठा व मागणी यातील तफावतीमुळे दरात मोठी वाढ होत आहे. गेल्या सहा महिन्यांत स्टीलच्या दरात जवळपास ३५ ते ४० टक्के वाढ झाली आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये भारतातील एकूण कच्च्या स्टीलचे उत्पादन १.८ टक्क्यांनी वाढले होते. २०१९ मध्ये एकूण १११.२ दशलक्ष टन उत्पादन झाले होते. २०२० मध्ये २९.७ टक्के उत्पादनात घट दिसून आली.  मिळेल त्या ठिकाणाहून स्टील मागविण्याकडे चीनसह सर्व विकसनशील देशांचा कल वाढला आहे. भारतात स्टीलच्या आयातीपेक्षा निर्यात वाढली आहे. गेल्या दहा वर्षांत चीन प्रथमच भारताकडून स्टील मोठ्या प्रमाणात आयात करीत आहे. चीनमधील स्टील उत्पादनात चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत ४.५ टक्के वाढ झाली असली, तरी वर्ल्ड स्टील असोसिएशनच्या मते २०२१ मध्ये चीनच्या स्टीलच्या मागणीत १०.६ टक्के वाढ राहण्याची चिन्हे आहेत. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतGovernmentसरकार