शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

'80 व्या वर्षी नोकरी मागतायत', अरुण जेटलींच्या खोचक टिकेला यशवंत सिन्हांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 11:04 AM

यशवंत सिन्हा यांनी अरुण जेटलींच्या टीकेला उत्तर देताना जर मी नोकरी मागितली असती तर अरुण जेटली आज त्या ठिकाणी नसते, जिथे ते आहेत असं म्हटलं आहे

ठळक मुद्देअरुण जेटली यांनी यशवंत सिन्हा यांना उत्तर देताना 80 व्या वर्षी नोकरी मागत आहेत अशी खोचक टीका केलीअरुण जेटलींच्या टीकेला उत्तर देताना जर मी नोकरी मागितली असती तर अरुण जेटली आज आहेत त्या ठिकाणी नसते असं यशवंत सिन्हा बोललेत'समस्या समजून घेण्यापेक्षा सरकार आपली पाठ थोपटत स्वत:ची स्तुती करण्यात व्यस्त आहेत हीच खरी समस्या आहे'

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यशवंत सिन्हा यांना उत्तर देताना 80 व्या वर्षी नोकरी मागत आहेत अशी खोचक टीका केलीये. यशवंत सिन्हा यांनी अरुण जेटलींच्या टीकेला उत्तर देताना जर मी नोकरी मागितली असती तर अरुण जेटली आज आहेत त्या ठिकाणी नसते असं म्हटलं आहे. देशाची अर्थव्यवस्था ढासळत असल्याला अरुण जेटली जबाबदार आहेत असं यशवंत सिन्हा बोलले होते. उत्तर देताना अरुण जेटली बोलले होते की, 'यशवंत सिन्हा 80 व्या वर्षी नोकरी मागत आहेत. मी अद्याप तरी अशा स्थितीत नाही की माजी अर्थमंत्री म्हणून वृत्तपत्रात लेख लिहीन'.

अरुण जेटली यांच्या खोचक टिकेला यशवंत सिन्हा यांनी उत्तर दिलं आहे. 'सरकार परिस्थिती समजून घेण्यामध्ये पुर्णपणे अयशस्वी ठरली आहे. समस्या समजून घेण्यापेक्षा आपली पाठ थोपटत स्वत:ची स्तुती करण्यात ते व्यस्त आहेत हीच खरी समस्या आहे', असं यशवंत सिन्हा बोलले आहेत. यशवंत सिन्हा यांनी आपला मुलगा जयंत सिन्हा याला आपल्याविरोधात मैदानात उतरवल्यावरुन सरकारवर टीका करत हे योग्य नसल्याचं म्हटलं आहे. 

इंडियन एक्स्प्रेसशी केलेल्या बातचीतमध्ये यशवंत सिन्हा यांनी सांगितलं आहे की, 'जे म्हणत आहेत की हा माझा वैयक्तिक हल्ला किंवा टीका आहे, ते चुकीचं आहे. जर अर्थव्यवस्थेशी संबंधित कोणतीही गोष्ट असेल तर त्यासाठी अर्थमंत्रीच जबाबदार असणार. यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना जबाबदार धरु शकत नाही. माझा मुलगा जयंत सिन्हाला माझ्याविरोधात उतरवत सरकार मुख्य मुद्द्यावरुन लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहे. मीदेखील वैयक्तिक हल्ले करु शकतो. पण मला त्यांच्या जाळ्यात अडकण्याची इच्छा नाही'. 

काय म्हणाले होते यशवंत सिन्हा ?अरुण जेटली हे ‘सुपरमॅन’ आहेत, असे समजून वित्त मंत्रालयासह चार मोठ्या खात्यांचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला. परंतु कामाच्या प्रचंड बोजामुळे जेटली वित्त मंत्रालयास न्याय देऊ न शकल्याने त्यांनी देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली, अशी सडेतोड टीका ज्येष्ठ भाजपानेते यशवंत सिन्हा यांनी केली होती. ‘इंडियन एक्स्प्रेस’ या दैनिकात, ‘आता मला बोलायलाच हवे,’ या शीर्षकाने लेख लिहून सिन्हा यांनी अर्थव्यवस्थेची सद्य:स्थिती व ही अवस्था का आली, यावर परखड भाष्य केले.

जेटली यांनी वित्तमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली, तेव्हा परिस्थिती खूपच अनुकूल होती. पण त्यांना हे काम झेपले नाही. वित्त मंत्रालयाचे काम मंत्र्याला अहोरात्र काम करूनही उरकणार नाही, एवढे असते. यासाठी पूर्णवेळ व लक्ष देण्याची गरज असते. पण एकाच वेळी चार मंत्रालयांचे काम सांभाळणारे जेटली ते करू शकले नाहीत

अरुण जेटलींनी दिलं होतं उत्तर माजी केंद्रीय वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी केलेल्या व्यक्तिगत टीकेला वित्तमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी पहिल्यांदाच नाव न घेता का होईना मार्मिक उत्तर दिले. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना जेटली यांनी सिन्हा यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांच्या सुरात सूर मिळवून सरकारवर हल्लाबोल करणारे दुसरे माजी वित्तमंत्री व काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनाही टोमणे मारले. धोरणांवर बोलण्याऐवजी व्यक्तिकेंद्रित टीका करणारे सिन्हा आज वयाच्या 80व्या वर्षीही मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून बसले आहेत व पूर्वी एकमेकांवर तुटून पडणारे सिन्हा व चिदंबरम आज ते विसरून एका सुरात बोलत आहेत, असा जेटली यांच्या अप्रत्यक्ष टीकेचा आशय होता. त्यांच्यासारखा मी अजून तरी ‘माजी’ वित्तमंत्री झालेलो नाही व त्यामुळे मला त्यांच्यासारखे बोलण्याची मोकळीक नाही, असे जेटली म्हणाले.

कोणाचेही नाव न घेता परंतु टोला नेमका कोणाला आहे हे स्पष्ट होईल अशा चतुराईने जेटली म्हणाले,‘ मीही त्यांच्यासारखा माजी वित्तमंत्री असतो तर (संपुआ-2च्या काळातील) ‘धोरण लकवा’ मलाही सोईस्करपणे विसरता आला असता. 1998 ते 2002 दरम्यानची बँकांची 15 टक्के बुडित कर्जे ही माझ्या विस्मृतीत गेली असती. 1991मध्ये वारसा म्हणून मिळालेली चार अब्ज डॉलरची चलन गंगाजळीही माझ्या लक्षात राहिली नसती.’! पूर्वी परस्परांवर तुटून पडणा-यांनी आता सुरात सूर मिळविला म्हणून त्याने वस्तुस्थिती बदलत नाही'.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीBJPभाजपा