तेलंगणाच्या जंगलात झालेल्या चकमकीत 8 नक्षलवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 17:12 IST2017-12-14T12:48:45+5:302017-12-14T17:12:58+5:30
नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत तेलंगणा राज्याच्या विशेष पोलीस दलाला मोठं यश मिळालं आहे. 8 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात विशेष दलाला यश आलं आहे. गुरूवारी सकाळी तेलंगणातील टेकुलापल्लीच्या जंगलात भेटापुडी गावाजवळ झालेल्या चकमकीत 8 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

तेलंगणाच्या जंगलात झालेल्या चकमकीत 8 नक्षलवाद्यांचा खात्मा
हैदराबाद: नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत तेलंगणा राज्याच्या विशेष पोलीस दलाला मोठं यश मिळालं आहे. 8 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात विशेष दलाला यश आलं आहे. गुरूवारी सकाळी तेलंगणातील टेकुलापल्लीच्या जंगलात भेटापुडी गावाजवळ झालेल्या चकमकीत 8 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
चकमक झालेल्या ठिकाणाहून विशेष दलाने मोठ्या प्रमाणात शस्त्रसामग्री देखील हस्तगत केली आहे. याशिवाय दैनंदीन दिवसता वापणा-याही अनेक वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. नक्षलवाद्यांच्या संशयित हालचालीची कुणकुण पोलिसांना मिळाली होती अशी माहिती आहे. सध्या याठिकाणी सुरक्षारक्षकांनी शोधमोहिम मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहे.
यापूर्वी या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात् करण्यात आला होता. सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरात झालेल्या चकमकीत पोलिसांनी सात नक्षलवाद्यांचा खातमा केला. यात पाच महिला नक्षलवाद्यांचा समावेश होता. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व प्रचारसाहित्य जप्त करण्यात आलं होतं. सिरोंचा तालुक्यातील कल्लेड जंगलात ही चकमक झाली होती.