स्मशानभूमीच्या शेडचे छप्पर कोसळून १८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी
By बाळकृष्ण परब | Updated: January 3, 2021 16:51 IST2021-01-03T16:11:28+5:302021-01-03T16:51:11+5:30
Accident News : स्मशानभूमीमधील शेडचे छप्पर कोसळून झालेल्या अपघातात सुमारे १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

स्मशानभूमीच्या शेडचे छप्पर कोसळून १८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी
गाझियाबाद - उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एका स्मशानभूमीमधील शेडचे छप्पर कोसळून झालेल्या अपघातात सुमारे १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.
गाझियाबादमधील मुरादनगर परिसरात ही दुर्घटना घडली. घटनास्थळावरील छायाचित्रे व्हायरल झाली असून, त्यामध्ये अनेकजण छताखाली अडकलेले दिसत आहेत. गाझियाबाद पोलीस आणि बचावकार्य करणारी टीम घटनास्थळावर दाखल झाली असून, मदतकार्य सुरू आहे.
गाजियाबाद: मुरादनगर में बारिश की वजह से छत गिरी, क़रीब 10-12 लोगों के फंसे होने की आशंका है। बचाव अभियान चल रहा है। pic.twitter.com/1WUHO5MLys
— ANI_HindiNews (@AHindinews) January 3, 2021
आज सकाळपासूनच दिल्ली आणि एनसीआरमध्ये पाऊस पडत आहे. दरम्यान, मुरादनगर येथील स्मशानभूमीत काही जण एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारांसाठी आले होते. पाऊस पडत असल्याने लोकांनी स्मशानातील शेडचा आधार घेतला होता. मात्र त्याचदरम्यान या शेडचे छप्पर अचानक कोसळले आणि त्याखाली अनेकजण दबले गेले.
17 people have died so far while 38 people have been rescued after a shed collapsed in Muradnagar. We've started a probe & we'll take strict action against those found guilty: Anita C Meshram, Divisional Commissioner, Meerut on Muradnagar roof collapse incident https://t.co/4geUbeviitpic.twitter.com/PgrXJ0ftY6
— ANI UP (@ANINewsUP) January 3, 2021
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उखलारसी गावातील एका व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी आणण्यात आला होता. या मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असताना उपस्थित लोकांनी शताखाली आश्रय घेतला होता. त्याचवेळी स्मशानमधील शेडचे छप्पर कोसळून सुमारे २० ते २५ जण त्याखाली अडकले. यामधील ८ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.