शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
4
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
5
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
6
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
7
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
8
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
9
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
10
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
11
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
12
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
13
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
14
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
15
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
16
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
17
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
18
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
19
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
20
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास

काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाईनंतर हिंसाचार, आठ नागरिकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 3:27 PM

दहशतवाद्यांविरोधातील कारवाईनंतर येथील स्थानिक नागरिक आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये धुमश्चक्री झाली. यावेळी नागरिकांनी सुरक्षा जवानांवर दगडफेक केली. सुरक्षा जवानांनी नागरिकांचा जमाव पांगविण्यासाठी केलेल्या गोळीबारात आठ नागरिकांचा मृत्यू झाला.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा जवानांनी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या कारवाईनंतर याठिकाणी हिंसाचार उसळला. येथील स्थानिक नागरिकांचा जमाव सुरक्षा जवानांवर चालून आला. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबारात आठ नागरिकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. 

आज सकाळी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा जवानांनी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर या चकमकीत एक जवान शहीद झाला. यावेळी झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर जहूर ठोकर याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळाले. राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबची हत्या करणाऱ्यांमध्ये जहूरचेही नाव होते. सुरक्षा जवानांनी त्याचा खात्मा करून मोठे यश मिळवले आहे. मात्र,  दुसरीकडे दहशतवाद्यांविरोधातील कारवाईनंतर येथील स्थानिक नागरिक आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये धुमश्चक्री झाली. यावेळी नागरिकांनी सुरक्षा जवानांवर दगडफेक केली. सुरक्षा जवानांनी नागरिकांचा जमाव पांगविण्यासाठी केलेल्या गोळीबारात आठ नागरिकांचा मृत्यू झाला. तर, अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

याचबरोबर, अद्यापही दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा जवानांना मिळाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्च ऑपरेशन राबवले जाते आहे. अनेक तास चाललेल्या चकमकीनंतर सुरक्षा जवानांना हिजबुलचा कमांडर जहूर ठोकर याचा खात्मा करण्यात यश आले आहे. यादरम्यान एक जवानही जखमी झाला आहे. सध्या तरी सुरक्षा जवानांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी