777

By Admin | Updated: August 23, 2015 20:40 IST2015-08-23T20:40:15+5:302015-08-23T20:40:15+5:30

777 | 777

777

>------------

राज्यात आगामी ५ दिवसांत पावसाची शक्यता
ढगाळ हवामानामुळे पिकांना काहीसा दिलासा ि
पुणे : राज्यात सुदैवाने काही भागात ढगाळ हवामान झाल्याने पिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आगामी ५ दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.
पावसात खंड पडल्याने खरिपाच्या सर्व पिकांना पाण्याचा ताण सहन असून पावसात खंड पडल्याने जिरायती भागात जेथे उशीरा उगवण झाली आहे, त्या पिकांना धोका उदभवण्याची व नव्या चा-याची उगवण होईपर्यंत जनावरांच्या चा-याचा तुटवडा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण चांगले असेल. १५ ऑक्टोबरपर्यंत चांगला पाऊस होईल. त्याचा फायदा रब्बीच्या पेरण्यांना होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, कर्नाटकच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा विरुन गेला आहे. गेल्या चोवीस तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. देवगडमध्ये ४ लांजा मंडणगड, माथेरान, पोलादपूर या भागात प्रत्येकी ३ मिलीमीटर व कानकोन, गुहागर, कणकवली, खेड, महाड, माणगाव, मुरुड, संगमेश्वर, सावंतवाडी येथे २ मिलीमीटर , चिपळूण, दापोली, हर्णे, खालापूर, कुडाळ, मुरबाड, श्रीवर्धन परिसरात १ मिलीमीटर पाऊस झाला.
मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर ५ , गगनबावडा २ मिलीमीटर पेठ, शाहुवाडी, वडगाव मावळ तसेच विदर्भातील लाखनी, भामरागड, सावली परिसरात १ मिलीमीटर पाऊस झाला. घाटमाथ्यावर वळवण येथे ७ लोणावळा येथे ४ मिलिमीटर पाऊस झाला, तर दावडी, भिरा, डुंगरवाडी, खंद, ताम्हिणी, शिरोटा, कोयना, खोपोली या भागातही काही प्रमाणात पावसाची नोंद झाली.
२४ ते २७ ऑगस्ट दरम्यान कोकण गोव्यात ब-याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. या काळात पुणे व आसपासच्या परिसरात एक दोन सरी पडतील,असा अंदाजही व्यक्त केला आहे.

Web Title: 777

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.