आपलेही झाले परके! पत्नी-मुलं परदेशात सेटल; घरात एकटं राहणाऱ्या डॉक्टरच्या वाट्याला मरणयातना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 14:59 IST2026-02-25T14:58:01+5:302026-02-25T14:59:09+5:30

वृद्ध डॉक्टर डॉ. हरकृष्ण सिंह गेल्या दीड वर्षांपासून आपल्या घरात एकटेच राहत होते. अत्यंत दयनीय अवस्थेत रेस्क्यू टीमने त्यांना उपचारासाठी नेलं. 

75 year old doctor found in pitiable condition karnal wife son daughter are settled in australia | आपलेही झाले परके! पत्नी-मुलं परदेशात सेटल; घरात एकटं राहणाऱ्या डॉक्टरच्या वाट्याला मरणयातना

फोटो - ndtv.in

हरियाणातील कर्नालमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एक वृद्ध डॉक्टर गेल्या दीड वर्षांपासून अत्यंत गंभीर अवस्थेत एकटेच राहत होते. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनंतर, एका सेवाभावी संस्थेच्या रेस्क्यू टीमने त्यांची सुटका केली आहे. या घटनेने संपूर्ण समाजाला हादरवून सोडलं आहे. वृद्ध डॉक्टर डॉ. हरकृष्ण सिंह गेल्या दीड वर्षांपासून आपल्या घरात एकटेच राहत होते. अत्यंत दयनीय अवस्थेत रेस्क्यू टीमने त्यांना उपचारासाठी नेलं. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

विशेष म्हणजे या डॉक्टरांच्या कुटुंबात कोणीही नाही किंवा त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे असं नाही. तर त्यांचं संपूर्ण कुटुंब ऑस्ट्रेलियात स्थायिक आहे, तरीही त्यांनी कधीही आपल्या वडिलांची साधी विचारपूस करण्याची तसदी घेतली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. हरकृष्ण सिंह गेल्या दीड वर्षांपासून उपेक्षित होते. त्यांनी दीर्घकाळापासून कपडेही बदलले नव्हते. 

घरात जे काही मिळेल ते खाऊन किंवा कधीतरी बाहेरून मागवून ते उदरनिर्वाह करत असत. आसपासच्या लोकांना जेव्हा त्यांच्या स्थितीचा अंदाज आला, तेव्हा त्यांनी रेस्क्यू टीमला पाचारण केलं. घटनास्थळी पोहोचलेली टीमही त्यांची अवस्था पाहून स्तब्ध झाली. घरात पसरलेली अस्वच्छता, एकाकीपण आणि आरोग्याकडे झालेले दुर्लक्ष स्पष्टपणे दिसत होतं.

कर्नालमध्ये आयुष्यभर मोफत रुग्णसेवा करणाऱ्या डॉ. हरकृष्ण यांची ही अवस्था पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले. 'अपना आशियाना' या संस्थेच्या टीमने मीरा घाटी परिसरातील एका घरातून त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं. टीम जेव्हा तिथे पोहोचली, तेव्हा ७५ वर्षीय डॉ. हरकृष्ण सिंह एका खाटेवर पडून होते. शरीरावर किडे वळवळत होते. परिस्थिती इतकी भीषण होती की, त्यांच्या जुन्या घराचा दरवाजा उघडताच संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली.

Web Title : परिवार ने छोड़ा: विदेश में बसे परिवार, डॉक्टर अकेले में पीड़ा सहते रहे

Web Summary : हरियाणा के एक डॉक्टर, जिनका परिवार ऑस्ट्रेलिया में बस गया, एक साल से अकेले थे और एक चैरिटी द्वारा बचाए गए। वे गंदगी में, उपेक्षित और बीमार रहते थे, बावजूद इसके कि उन्होंने जीवन भर मुफ्त चिकित्सा सेवा दी। पड़ोसियों ने उनकी गंभीर हालत के बारे में बचाव दल को सतर्क किया।

Web Title : Abandoned by family: Doctor Suffers Alone as Family Settles Abroad

Web Summary : Haryana doctor, left alone for a year while his family lives in Australia, was rescued by a charity. He lived in squalor, neglected and ailing, despite a lifetime of free medical service. Neighbors alerted rescuers to his dire condition.

टॅग्स :doctorडॉक्टर