73rd Independence day Pm narendra modi speech live updates | Independence Day Live: दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांचा पदार्फाश करत राहणार- मोदी
Independence Day Live: दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांचा पदार्फाश करत राहणार- मोदी

नवी दिल्ली: देशभरात ७३ व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. गेल्याच आठवड्यात मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाचे तीव्र पडसाद पाकिस्तानात उमटले. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी तर काल संसदेत भाषण करताना भारताला थेट युद्धाची धमकी दिली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मोदी त्यांच्या भाषणातून इम्रान खान यांना प्रत्युत्तर देणार की अनुल्लेखानं मारणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. याशिवाय गेल्या काही महिन्यांपासून ऑटोमोबाईलसह विविध क्षेत्रांमध्ये मंदी पाहायला मिळते आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था अडचणीचं सापडल्याचं चित्र निर्माण झालं आहे. यावर मोदी भाष्य करणार का, याकडेही देशवासीयांचं लक्ष लागलं आहे. 

LIVE

Get Latest Updates

09:02 AM

२०२२ पर्यंत देशातील किमान १५ पर्यटनस्थळांना भेटी द्या- मोदी

09:00 AM

दुकानदारांनी डिजिटल पेमेंटसाठी पुढाकार घ्यावा- मोदी

08:59 AM

2 ऑक्टोबरपासून पुनर्प्रक्रिया करणाऱ्या प्लास्टिकचा वापर करण्याचा संकल्प करू- मोदी

08:55 AM

चीफ ऑफ डिफेन्समुळे संरक्षण सामर्थ्यात वाढ होणार- मोदी

08:48 AM

देशवासीयांनी स्वच्छ भारत अभियान यशस्वी करुन दाखवलं- मोदी

08:46 AM

यापुढे चीफ डिफेन्स ऑफ सिक्युरिटी पद अस्तित्त्वात असेल; मोदींची मोठी घोषणा

08:42 AM

भारतच नव्हे, तर बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंकेतही दहशतवाद वाढवण्याचं काम केलं जातंय- मोदी

08:41 AM

दहशतवादाला पोसणाऱ्यांचा पदार्फाश करण्याचं काम भारत करतोय- मोदी

08:40 AM

दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांविरोधात आम्ही निर्धारानं लढतोय- मोदी

08:37 AM

आम्ही महागाई नियंत्रणात आणली आणि विकास दरदेखील कायम ठेवला-मोदी

08:33 AM

पायाभूत सोयीसुविधांसाठी १०० लाख कोटींची तरतूद-मोदी

08:32 AM

७० वर्षांमध्ये अर्थव्यवस्था २ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचली; मात्र त्यानंतर अवघ्या ५ वर्षांत अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरनं वाढली-मोदी

08:30 AM

5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं स्वप्न शक्य- मोदी

08:28 AM

लोकांच्या आयुष्यातील सरकारची ढवळाढवळ टाळण्यासाठी अनेक कायदे रद्द केले- मोदी

08:27 AM

आधी लोक साध्या डांबरी रस्त्याचं स्वप्न पाहायचे, आता चौपदरी-सहापदरी रस्त्याची स्वप्नं पाहतात-मोदी

 

08:25 AM

ना सरकार दबाव हो, ना सरकार का अभाव हो- मोदी

08:23 AM

सरकारी कामं लवकरात लवकर व्हावीत यासाठी कटिबद्ध- मोदी

08:23 AM

व्यवसाय सुलभीकरणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू- मोदी

08:22 AM

कुटुंब नियोजन करणं म्हणजे देशाच्या विकासात योगदान देणं- मोदी

08:18 AM

लोकसंख्या वाढीमुळे इतर समस्या वाढतात- मोदी

08:15 AM

वाढती लोकसंख्या देशासमोरील गंभीर समस्या- मोदी

08:14 AM

येत्या काळात जल जीवन मिशनवर काम करू; मोदींचं देशवासीयांना आवाहन

08:11 AM

आता जलसंवर्धनासाठी चळवळ सुरू करण्याची गरज-मोदी

08:09 AM

ज्यांच्याकडे इतकी वर्षे बहुमत होतं, त्यांनी कलम ३७० कायमस्वरुपी राहावं यासाठी काय केलं?- मोदी

08:01 AM

जुन्या व्यवस्थेमुळे जम्मू, काश्मीर, लडाखमध्ये भ्रष्टाचार बोकाळला- मोदी

07:57 AM

गेल्या ७० वर्षांमध्ये जे झालं नाही, ते ७० दिवसांमध्ये करुन दाखवलं- मोदी

07:56 AM

आपण बालविवाह, सती प्रथा बंद केली, मग तिहेरी तलाक का बंद करू शकलो नाही- मोदी

07:53 AM

मी जनतेची कामं करायला आलोय- मोदी

07:53 AM

कलम ३७० हटवण्याचा निर्णय नव्या सरकारनं पहिल्या १० आठवड्यांमध्ये घेतला- मोदी

07:52 AM

आम्ही समस्या टाळत नाही, आम्ही समस्या फार काळ ठेवतही नाही- मोदी

07:52 AM

तिहेरी तलाक राजकीय निर्णय नव्हे, समानतेसाठी घेतलेला निर्णय- मोदी

07:51 AM

मुस्लिम महिलांना समानतेचा अधिकार मिळावा यासाठी तिहेरी तलाक रद्द केला- मोदी

07:50 AM

कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे मुस्लिम महिलांना त्यांचे अधिकार नाकारले गेले- मोदी

07:50 AM

तिहेरी तलाकबदद्ल मुस्लिम महिलांच्या मनात भीती होती- मोदी

07:47 AM

सब का साथ, सब का विकासवर देशवासीयांनी विश्वास दाखवला- मोदी

07:46 AM

माझा देश बदलू शकतो हा विश्वास गेल्या ५ वर्षांनी लोकांना दिला- मोदी

07:45 AM

२०१४ मध्ये लोकांच्या मनात निराशा होती, पण २०१९ मध्ये लोकांच्या मनात केवळ आशा अन् आशा- मोदी

07:44 AM

पूरग्रस्तांच्या दु:खात सहभागी- मोदी

07:41 AM

नव्या सरकारनं अवघ्या १० आठवड्यांमध्ये कलम ३७०, तिहेरी तलाकबद्दल महत्त्वाचे निर्णय घेतले- मोदी

07:40 AM

कलम ३७० रद्द करुन वल्लभभाई पटेल यांचं स्वप्न साकारण्याकडे एक पाऊल- मोदी

07:39 AM

स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या, प्राणांची आहुती दिलेल्यांचं मोदींकडून स्मरण

07:35 AM

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजवंदन

07:31 AM

लाल किल्ल्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित

07:25 AM

पंतप्रधान मोदींना सुरक्षा दलांकडून गार्ड ऑफ ऑनर

07:19 AM

पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावर पोहोचले

07:14 AM

थोड्याच वेळात मोदी देशाला संबोधित करणार

07:11 AM

पंतप्रधान मोदींकडून देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

Web Title: 73rd Independence day Pm narendra modi speech live updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.