शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

'700 वर्षांपूर्वी दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुघलकने केली होती नोटाबंदी'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 5:41 AM

'मोहम्मद बिन तुघलकने 700 वर्षांपूर्वी नोटाबंदी केली होती. अनेक असे राजे होते ज्यांनी स्वतःची नवी मुद्रा आणली. काहींनी नवीन मुद्रा चलनात आणण्यासोबत जुनी मुद्रा देखील चलनात कायम ठेवली. पण 700 वर्षांपूर्वी सुलतान तुघलकने नवी मुद्रा चलनात आणली आणि जुनं चलन बाद ठरवलं. 

अहमदाबाद - देशाची अर्थव्यवस्था आणि केंद्र सरकारच्या कारभारावरून मोदी सरकारवर टीका करणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोच-या शब्दात निशाणा साधला आहे. नोटाबंदीवरून बोलताना सिन्हा यांनी पंतप्रधान मोदींची तुलना मोहम्मद बिन तुघलक याच्यासोबत केली. नोटाबंदीवर टीका करताना नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेला 3.75 लाख कोटी रूपयांचं नुकसान झालं, असं वाजपेयी सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेले सिन्हा म्हणाले.  

'नवभारत टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदींची तुलना 14 व्या शतकातील दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुघलक याच्यासोबत करताना सिन्हा म्हणाले,   'मोहम्मद बिन तुघलकने 700 वर्षांपूर्वी नोटाबंदी केली होती. अनेक असे राजे होते ज्यांनी स्वतःची नवी मुद्रा आणली. काहींनी नवीन मुद्रा चलनात आणण्यासोबत जुनी मुद्रादेखील चलनात कायम ठेवली. पण 700 वर्षांपूर्वी सुलतान तुघलकने नवी मुद्रा चलनात आणली आणि जुनं चलन बाद ठरवलं'. 

कोण होता तुघलक - 14 व्या शतकात काही काळासाठी दिल्लीच्या गादीवर राज्य करणा-या मोहम्मद बिन तुघलकला त्याच्या वादग्रस्त निर्णयांमुळे ओळखलं जातं. अचानक राजधानी दिल्लीऐवजी दौलताबाद करण्याचा निर्णय त्याने घेतला होता. तसंच सोनं किंवा चांदीचं नाणं सुरू असताना तांब्याच्या नाण्याचं चलन तुघलकनेच सुरू केलं होतं. 

नोटबंदी आणि जीएसटी यासारख्या मुद्दयांवरून सिन्हा गेल्या अनेक दिवसांपासून सिन्हा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींवर टीका करत आहेत. जीएसटी लागू करताना डोक्याचा वापर केला नाही असं ते म्हणाले होते.   

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाNote BanनोटाबंदीNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारEconomyअर्थव्यवस्थाGSTजीएसटी