शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
2
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
3
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
4
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
6
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
7
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
8
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
9
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
10
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
11
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
12
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
13
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
14
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
15
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
16
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
18
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
19
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
20
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?

नारायण मूर्तींनी दिलेला 70 तास कामाचा सल्ला; विरोधकांनी अधिवेशनात उपस्थित केला मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 6:10 PM

संसदेच्या अधिवेशनात तीन विरोधी खासदारांनी 70 तास कामाचा मुद्दा उपस्थित केला. यावर केंद्रीय मंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

70-Hour Work In Week: भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी Infosys चे सह-संस्थापक नारायण मूर्ती गेल्या महिन्यापासून चर्चेत आहेत. कर्मचाऱ्यांनी दररोज 12 तास म्हणजे आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. त्यांचा या मुद्द्याची देशभरात चर्चा झाली. उद्योग जगतात दोन गट पडले, काहींनी याचे समर्थन केले तर काहींनी विरोध केला. आता हाच मुद्दा संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्येही उपस्थित झाला.

मंत्री रामेश्वर तेली यांनी स्पष्ट केली भूमिका मीडिया रिपोर्स्सनुसार, सोमवारी संसदेत तीन विरोधी खासदारांनी यावर सरकारची भूमिका जाणून घेण्यासाठी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली म्हणाले की, 'आठवड्यातून 70 तास काम करण्यासंबंधीचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे आलेला नाही.

या तीन खासदारांनी प्रश्न विचारला होताकाँग्रेस खासदार कोमटी वेंकट रेड्डी, भारत राष्ट्र समितीचे मन्ने श्रीनिवास रेड्डी आणि वायएसआरसीपीचे नेते कनुमुरु रघु रामा कृष्णा राजू, या तीन खासदारांनी अधिवेशनता प्रश्न उपस्थित केला होता. 

काय म्हणाले होते नारायण मूर्ती?नारायण मूर्ती यांनी गेल्या महिन्यात इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांच्याशी 'द रेकॉर्ड' या पॉडकास्टसाठी बोलताना म्हटले होते की,  अनेक देशांनी मागील काही दशकात मोठी प्रगती केली आहे, त्या देशांशी स्पर्धा करण्यासाठी देशातील तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करावे लागेल. सध्या भारताची कामाची उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. आपली सर्वात मोठी स्पर्धा चीनशी आहे, त्यामुळे तरुणांना अतिरिक्त काम करावे लागेल, जसे जपान आणि जर्मनीने दुसऱ्या महायुद्धानंतर केले होते.

टॅग्स :Narayana Murthyनारायण मूर्तीParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकारbusinessव्यवसायInfosysइन्फोसिस