शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

रस्ते बांधणीसाठी ७ लाख कोटी,३२ कोटी मनुष्यदिन रोजगारांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 4:25 AM

भारतमाला महामार्ग प्रकल्पातहत देशभरातील सीमावर्ती भागांना जोडणा-या ३४,००० किलोमीटर नवीन मार्गांसह केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी ६.९२ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह २०२२ पर्यंत ८३ हजार ६७७ किलोमीटर रस्त्यांचा विकास आणि विस्तार आजवरच्या सर्वांत मोठ्या योजनेवर मंजुरीसह शिक्कामोर्तब केले आहे.

नवी दिल्ली : भारतमाला महामार्ग प्रकल्पातहत देशभरातील सीमावर्ती भागांना जोडणा-या ३४,००० किलोमीटर नवीन मार्गांसह केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी ६.९२ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह २०२२ पर्यंत ८३ हजार ६७७ किलोमीटर रस्त्यांचा विकास आणि विस्तार आजवरच्या सर्वांत मोठ्या योजनेवर मंजुरीसह शिक्कामोर्तब केले आहे.विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केलेली ही सर्वांत मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा होय.आर्थिक घडामोडीला चालना देत देशभरात येत्या पाच वर्षांत किमान १४.२ कोटी मनुष्यदिन रोजगार निर्माण होतील. या योजनेत दोन मुख्य ठिकाणांदरम्यान चारपदरी रस्ते बांधून प्रमुख मार्गांवरील वाहतुकीचा वेग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. हे विशेष मार्ग बव्हंशी लहान-लहान असतील. तसेच मालवाहक वाहनांच्या गतिमान हालचाली नियंत्रित असतील.खराब, अरुंद रस्ते आणि वाढत्या वर्दळीमुळे भारतात मालट्रक दिवसागणिक सरासरी २५०-३०० किलोमीटरचा पल्ला गाठू शकतात. तुलनेत विकसित देशांत हे प्रमाण प्रतिदिन ७००-८०० किलोमीटर आहे. या नवीन महामार्ग विकास कार्यक्रमात रस्ते तयार करून गतिमानतेत सुधारणा करून वाहतुकीचा खर्च कमी करण्याचा समावेश आहे. रस्त्यांचे उत्तम जाळे आणि नीटनेटके चिन्हाधारित रहदारीमुळे रस्ते वाहतूक क्षेत्रात लक्षणीय बदल होईल, असे एका अधिकाºयाने या योजनेबाबत सांगितले.भारतीय राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. यामुळे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यास मदत होईल.प्रकल्पाची व्याप्तीभारतमाला ‘कनेक्टींग इडिया’ कार्यक्रमाबाबत पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, या प्रकल्पात ९००० किलोमीटरचे आर्थिक मार्गाचा समावेश आहे. आंतर मार्ग/ उपमार्ग ६ हजार किलोमीटर, राष्टÑीय मार्ग क्षमता सुधारणा ५ हजार किलोमीटर, सीमावर्ती मार्ग/ आंतरराष्टÑीय संपर्क मार्ग २००० किलोमीटर, किनारपट्टी मार्ग/बंदर जोड मार्ग २ हजार किलोमीटर, हरित क्षेत्र एक्स्प्रेस-वे ८०० किलोमीटर, राष्टÑीय महामार्गविकास प्रकल्पातील शिलकी१० हजार किलोमीटर प्रकल्पाचा समावेश आहे. यासाठी ५.३५ लाख कोटींचा खर्च येईल. भारतमाला प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती.>४४ आर्थिक विशेष महामार्गभारतमाला महामार्ग प्रकल्पात एकासल्लागार संस्थेने ४४ आर्थिक विशेष महामार्ग निश्चित केले होते.तसेच या वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान कार्यालयाने सार्वजनिक गुंतवणूक मंडळाला प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी देण्यास सांगितले होते.व्यय सचिवाच्या अध्यक्षतेखालील सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने याला मंजुरी दिली होती.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा