6 killed in snow; Accident on Indo-China border | हिमपातात सहा जवानांचा मृत्यू; भारत - चीन सीमेवरील दुर्घटना 
हिमपातात सहा जवानांचा मृत्यू; भारत - चीन सीमेवरील दुर्घटना 

ठळक मुद्देभारत-चीन सीमेवरील शिपकला येथे आज सकाळी 11 वाजता ही दुर्दैवी दुर्घटना घडली.याआधी भारत-तिबेट सीमा पोलीस दलाचे काही जवानही हिमपातात सापडले होते.

सिमला - पुलवामा दहशतवादी हल्याचे प्रकरण ताजे असतानाच हिमाचल प्रदेशाच्या किन्नौर जिल्ह्यात झालेल्या हिमपातात लष्कराचे सहा जवान मृत्युमुखी पडले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

भारत-चीन सीमेवरील शिपकला येथे आज सकाळी 11 वाजता ही दुर्दैवी दुर्घटना घडली. हे सर्व जवान जम्मू-काश्‍मीर रायफल्सचे असून एका जवानाचा मृतदेह सापडल्याची माहिती किन्नौरचे उपायुक्त गोपाल चंद यांनी प्रसारमाध्यमांना दिली. अन्य पाच जवान अद्याप बेपत्ता असून ते मरण पावल्याची भीती वर्तविण्यात आली आहे. याआधी भारत-तिबेट सीमा पोलीस दलाचे काही जवानही हिमपातात सापडले होते. मात्र, त्यांना वाचविण्यात आले. 

Web Title: 6 killed in snow; Accident on Indo-China border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.