कर्नाटकात भीषण अपघात, कार आणि ट्रकच्या धडकेत ६ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 14:54 IST2024-12-21T14:42:05+5:302024-12-21T14:54:45+5:30
कर्नाटकात कंटेनर ट्रक कारवर उलटल्याने सहा जणांचा मृत्यू झाला.

कर्नाटकात भीषण अपघात, कार आणि ट्रकच्या धडकेत ६ जणांचा मृत्यू
कर्नाटकात कंटेनर ट्रकची कारला धडक बसून अपघात झाला. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. ही अपघात कर्नाटकातील नेलमंगळा येथे झाला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना बेंगळुरूच्या बाहेरील तळकेरेजवळ घडली. मोठा मालवाहू कंटेनर सहा जणांना घेऊन जाणाऱ्या कारवर ट्रक पलटी झाला.
या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्ग-48 वरील वाहतूक विस्कळीत झाली. मृताची लगेच ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी दुपारी राष्ट्रीय महामार्ग-४ वर घडली. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर कारवर आदळला.
अतुल सुभाष प्रकरणात आता रिंकीची एन्ट्री; पत्नी निकिताने केला खळबळजनक दावा
पोलिसांनी सांगितले की, नेलमंगला पोलीस परिक्षेत्र अधिकाऱ्याने घटनास्थळी भेट दिली असून मृतदेह ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे. बेंगळुरू-तुमाकुरू राष्ट्रीय महामार्गावर नेलमंगला येथील बेगुरुजवळ कँटर आणि कार यांच्यात झालेल्या अपघातामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
यापूर्वी कर्नाटकातील तुमकुरू येथे भीषण अपघात झाला होता. या अपघातात तुमकुरूच्या सिरा तालुक्यातील चिक्कनहल्ली उड्डाणपुलावर बस दुभाजकावर आदळली, या अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, सुमारे ३० प्रवासी घेऊन ही बस बेंगळुरूच्या दिशेने जात असताना पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.