आग्रा एक्स्प्रेस वेवर कार आणि बसच्या अपघातात 6 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 09:24 IST2020-02-18T08:26:37+5:302020-02-18T09:24:38+5:30

बस डिव्हायडरवरून उडी घेऊन दुसऱ्या लेनमध्ये गेल्यानंतर हा अपघात झाला.

6 killed in car, bus accident on Agra Expressway | आग्रा एक्स्प्रेस वेवर कार आणि बसच्या अपघातात 6 जणांचा मृत्यू

आग्रा एक्स्प्रेस वेवर कार आणि बसच्या अपघातात 6 जणांचा मृत्यू

कानपूरः उत्तर प्रदेशचे जनपद कानपूरमधल्या बिल्हौर मकनपूर ठाणे क्षेत्रातील लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वेवर एसयूव्ही कार आणि रोडवेज बसच्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमधले पाच जण कारमध्ये होते, तर एका बसचालकाचा समावेश आहे. ही बस आग्र्याहून बिहारच्या मुजफ्फरपूरला जात होती. प्राथमिकदृष्ट्या या अपघाताच्या मागे बसचालकाचा हलगर्जीपणा असल्याचं समोर येत आहे. बस डिव्हायडरवरून उडी घेऊन दुसऱ्या लेनमध्ये गेल्यानंतर हा अपघात झाला. समोर उभ्या असलेल्या फॉर्च्युनर गाडीला तिनं धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचे पत्रेच निखळले. या अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.



 

Web Title: 6 killed in car, bus accident on Agra Expressway