तीन महिन्यात ५७ वाहन परवाने रद्द
By Admin | Updated: March 20, 2015 22:39 IST2015-03-20T22:39:56+5:302015-03-20T22:39:56+5:30
पुणे : मद्यपी आणि रॅश ड्रायव्हींग करणा-या ५७ वाहनचालकांचे वाहन परवाने प्रादेशीक परिवहन कार्यालयाने ९० दिवसांसाठी निलंबीत केले आहेत. रस्त्यांवरील गंभीर आणि प्राणांतिक अपघातांचे प्रमाण कमी नियमभंग करणा-या वाहनचालकांविरुद्ध कारवाई केल्यानंतर त्यांचा वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी आरटीओला पाठवला होता.जानेवारी २०१५ ते ११ मार्चपर्यंतच्या ६४ प्रस्तावांपैकी ५७ वाहनचालकांचे परवाने निलंबीत करण्यात आल्याची माहिती वाहतूक उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली.

तीन महिन्यात ५७ वाहन परवाने रद्द
प णे : मद्यपी आणि रॅश ड्रायव्हींग करणा-या ५७ वाहनचालकांचे वाहन परवाने प्रादेशीक परिवहन कार्यालयाने ९० दिवसांसाठी निलंबीत केले आहेत. रस्त्यांवरील गंभीर आणि प्राणांतिक अपघातांचे प्रमाण कमी नियमभंग करणा-या वाहनचालकांविरुद्ध कारवाई केल्यानंतर त्यांचा वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांनी आरटीओला पाठवला होता.जानेवारी २०१५ ते ११ मार्चपर्यंतच्या ६४ प्रस्तावांपैकी ५७ वाहनचालकांचे परवाने निलंबीत करण्यात आल्याची माहिती वाहतूक उपायुक्त सारंग आवाड यांनी दिली. गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर २०१४ या कालावधीदरम्यान वाहतूक पोलिसांनी आरटीओकडे एकूण १४०६ वाहन परवाने निलंबीत करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. पुणे आणि पिंपरी चिंचवड आरटीओकडे या वर्षीही जानेवारी २०१५ ते ११ मार्च २०१५ पर्यंत एकूण ६४ प्रस्ताव पाठवण्यात आले होते. यातील पुणे आरटीओने नियमभंग करणा-या ५७ वाहन चालकांचे परवाने रद्द केले आहेत. परवाने रद्द करण्यात आलेल्या वाहनचालकांना ९० दिवस वाहन चालविता येणार नाही. या काळात त्यांनी वाहन चालविल्यास त्यांच्यावर पुन्हा कारवाई करण्यात येणार आहे. दारु पिऊन तसेच रस्त्यावर वेडीवाकडी वाहने चालवल्यामुळे अपघातांचा धोका संभवतो. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या प्राणांतिक अपघातांमध्ये मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण दुचाकीस्वारांचे आहे. या कारवाईमुळे दारु पिऊन वाहन चालवण्याला काही प्रमाणात आळा बसेल असे उपायुक्त आवाड यांनी सांगितले.