शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

सहकारातून ८५ उद्योगांना मिळाला आधार ५५ वर्षांची परंपरा: सिमेंट पोल, महावितरणनलाही जागा, खान्देशातील पहिला उपक्रम

By admin | Updated: February 3, 2016 00:28 IST

(एमआयडीसीसमस्या-२)चंद्रशेखरजोशी/जळगाव : सहकार औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून उद्योगांच्या श्रृंखलेला चालना मिळाली आणि एक, एक करीत ८५ उद्योगांना सहकार औद्योगिक वसाहतीत जागा मिळाली व हजारो हातांना कामे मिळाली. खान्देशातील पहिली सहकार औद्योगिक वसाहत त्या काळात जळगावातउभी राहीली.

(एमआयडीसीसमस्या-२)चंद्रशेखरजोशी/जळगाव : सहकार औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून उद्योगांच्या श्रृंखलेला चालना मिळाली आणि एक, एक करीत ८५ उद्योगांना सहकार औद्योगिक वसाहतीत जागा मिळाली व हजारो हातांना कामे मिळाली. खान्देशातील पहिली सहकार औद्योगिक वसाहत त्या काळात जळगावातउभी राहीली.
पूर्वी सहकार औद्योगिक वसाहतीस जुनी औद्योगिक वसाहत असेही संबोधले जात असे. जळगाव क्षेत्रातील काही व्यावसायिकांनी एकत्र येऊन ४ सप्टेंबर १९६१ मध्ये सहकार औद्योगिक वसाहतीची स्थापना केली.
------
उद्योग वाढीचा ध्यास
कोणत्याही शहराची ओळख ही तेथील उद्योग धंद्यांमुळे होत असते. जसे केळी आणि कापूस पिकविणारा प्रदेश म्हटले म्हणजे जळगाव जिल्‘ाकडे पाहीले जात असते. त्याच पद्धतीने औद्योगिक क्षेत्रावरूनही शहराची ओळख होत असते. जळगावच्या औद्योगिक क्षेत्रालाही तशी परंपरा आहे. या परंपरेस १९६१ मध्ये राजाभाऊ मंत्री, पा.र. पाटणकर, तुकाराम श्रीपत चौधरी, प्र.ह.दामले, भा.गो. पाटील, पु.का. लाठी, द.लो. सोनवणे, छ.रा. बाविस्कर या मंडळींनी एकत्र येऊन सुरूवात केली. हेच औद्योगिक सहकारी वसाहतीचे पहिले संचालक मंडळ होते. सध्या उद्योजक लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी हे औद्योगिक सहकारी वसाहतीचे चेअरमन आहेत.
------
हळू हळू उभे राहीले ८५ उद्योग
औद्योगिक सहकारी वसाहतीच्या स्थापनेनंतर शासनाने विविध उद्योगांसाठी ४६ एकर ३८ गुंठे जागा खास उद्योग क्षेत्रासाठी संपादीत केली. १९६३ मध्ये ही जागा सहकार आद्योगिक वसाहतीच्या संचालक मंडळाच्या ताब्यात आली. या जागेत १३३ प्लॉट त्यावेळी विविध उद्योगांसाठी पाडण्यात आले. मागणी करणार्‍या ६५ उद्योजकांना विविध उद्योगांसाठी ही जागा त्यावेळी वितरीत करण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्य विद्यत मंडळ म्हणजेचे आजचे महावितरण कंपनी, पी.सी. पोल फॅक्टरीला सिमेंटचे पोल तयार करण्यासाठी २० प्लॉट त्यावेळी देण्यात आले होते. या संस्थेचे वैशिष्टय म्हणजे संस्थेने आपल्या भुखंडावर लहान उद्योजकांसाठी प्रशासकीय इमारत संकुलही उभारले आहे. खास असे उद्योग दालनही येथे उभे आहे.
विविध उद्योगांमुळे मोठा रोजगार
सहकार औद्योगिक वसाहत क्षेत्रात कापूस प्रक्रिया करणारा रूबी सर्जिकल, लुंकड केबल, पॉलिमेड फार्मा, जय भारत, दालमिल, अभयकुमार दालमिल, अरूण सोप इंडस्ट्री, दीपक इंडस्ट्री, कीर्ती इंडस्ट्री, सुरेश आयर्न इंडस्ट्री, मारूती प्रेस, स्वस्तीक पाईप उद्योग असे विविध उद्योग गेल्या अनेक वर्षांपासून उभे असून या माध्यमातून हजारो हातांना काम मिळाले आहे. कोट्यवधीची उलाढाल या माध्यमातून होत असते.
महामंडळाने दिल्या सुविधा
वसाहतीच्या जागेचा अधिक विकास व्हावा म्हणून शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला काही जमिनीचे हस्तांतरण केले. या माध्यमातून महामंडळाने या क्षेत्रास पाणी, रस्ते आदी सुविधा प्रारंभीच्या कालखंडात पुरविल्या. हा या उद्योग क्षेत्रास एक मोठा आधार ठरला. कारण वीज, पाणी आणि दळणवळणाची साधणे या प्रमुख गरजा उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक असतात. त्याच्या उपलब्धतेमुळे सहकार औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची गेल्या काही वर्षात मोठी भरभराट झाली असल्याचीच प्रचिती येत असते. शहराचा विकास या माध्यमातून होत गेला.
अनेक कामे अद्याप बाकी
सहकार औद्योगिक क्षेत्रात उद्योगांची भरभराट झाली. पाणी, रस्त्याची सुविधा झाली मात्र गटारींची व्यवस्था अद्याप नाही. त्यामुळे पावसाळ्यात अनेक उद्योगांमध्ये पाणी शिरते. या परिसरातील पथदिवेही बंद असल्याच्या उद्योजकांच्या तक्रारी आहेत. महाराष्ट्र औद्योगिक मंडळाने उद्योगांच्या भुखंडांवर सेवा कर वसूल केला व केला जात आहे. मात्र न्यायालयाचे आदेश होऊनही इतर सुविधा अद्याप पुरविण्यात आल्या नसल्याच्याही तक्रारी आहेत. महापालिका कारखानदारांकडून मालमत्ता कर, पथदिवे कर, साफसफाई कर वसूल करते मात्र सेवा पुरविण्यात दुर्लक्ष होत असते. नियमित साफसफाई होत नसल्याने साचलेला कचरा हीदेखील मोठी समस्या बर्‍याच वेळेस असते, अशी उद्योजकांची तक्रार आहे.
पुरक उद्योगांनाही आधार
या क्षेत्रात अनेक पुरक उद्योग कालांतराने उभे राहीले. यात चहा, अल्पोपहाराच्या सुविधा, खाणावळी, हॉटेल्स असे एक ना अनेक पुरक उद्योग या क्षेत्रात सुरू असून त्या माध्यमातूनही मोठी रोजगार निर्मिती या परिसरात होत असते. (क्रमश:)