शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

अपुऱ्या आरोग्यसेवेवर ५२% लोकसंख्या विसंबून; ग्रामीण आरोग्य केंद्रांची हजारो पदे रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 05:58 IST

ग्रामीण आरोग्य केंद्रांची हजारो पदे रिक्त

- नितीन अग्रवाललोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोरोना महामारीत सर्वात जास्त फरफट झालेल्या महाराष्ट्रात ग्रामीण भागात राहणारे अपुऱ्या आरोग्य सेवेवर अवलंबून आहेत. गावात राहणाऱ्या ५२ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्येसाठी आरोग्य केंद्रे मोठ्या प्रमाणावर कमी आहेत. गरजेच्या तुलनेत ४८ टक्के सामुदायिक आरोग्य केंद्रे, ७९ टक्के प्राथमिक आणि ७५ टक्के उपकेंद्रेच सुरू आहेत. तेथेही निम्मेच कर्मचारी आहेत.

आरोग्य सेवेवरील सरकारकडील अधिकृत आकडेवारीनुसार ग्रामीण भागात सरासरी ६,०६३ लोकसंख्येला सगळ्यात खालच्या स्तरावरील आरोग्य सेवा म्हणजे एक उपकेंद्र उपलब्ध आहे. ३५२९५ लोकांच्या आरोग्याची जबाबदारी एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर आणि सरासरी २,३२,२१२ लोक फक्त एका सामुदायिक आरोग्य केंद्रावर आहे.

ग्रामीण आरोग्य आकडेवारीनुसार मार्च २०२० पर्यंत राज्यात ग्रामीण भागात एकूण १४१७० उपकेंद्रे असायला हवीत. पण प्रत्यक्षात १०६४७ सुरू आहेत. २३०९ प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज असताना फक्त १८२९ उपलब्ध आहेत. राज्यात सामुदायिक आरोग्य केंद्रांची संख्या २७८ होती. गरज होती ५७७ केंद्रांची. राज्यात गेल्या १५ दिवसात एकूण १९४ उपकेंद्रे आणि ४९ प्राथमिक आरोग्य केंद्रे वाढवली गेली. पण १०४ सामुदायिक आरोग्य केंद्रे कमी झाली.

अपुरी ग्रामीण आरोग्य व्यवस्थापद                              कार्यरत     कमी    स्वीकृत पद एएनएम                १२८०४         १९६२         १४७६६डॉक्टर्स                    २८४८      ७३९            ३५८७विशेषज्ञ चिकित्सक        ३९९           ७१३          १११२आयुष चिकित्सक      ५९          २१९             २७८रेऑडिलॉजिस्ट           १०४       १७४          २७८फार्मासिस्ट                 १९५८    १४९             २१०७प्रयोगशाळा तंत्रज्ञ     १५७४     ५३३              २१०७परिचारिका               ३१६५     ६६९              ३८३४आरोग्य सहायक       ३००५      ६५३            ३६५८

टॅग्स :Healthआरोग्य