धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 15:24 IST2025-04-25T15:22:34+5:302025-04-25T15:24:07+5:30
कोरबा जिल्ह्यात एका लग्नातील जेवणामुळे तब्बल ५१ जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात एका लग्नातील जेवणामुळे तब्बल ५१ जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवल्यानंतर ३७ मुलांसह एकूण ५१ लोक अन्नातून विषबाधा झाल्यामुळे गंभीर आजारी पडले. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, या सर्व लोकांना कोरबा येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
गुरुवारी रात्री उरगा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पहारीपारा गावात एका लग्न समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. येथे जेवल्यानंतर काही पाहुण्यांना उलट्या आणि जुलाब झाले. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गोपाल कंवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये १४ मुली, २३ मुलं, ११ महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. अन्नातून विषबाधा होण्याचं नेमकं कारण अद्याप कळलेलं नाही आणि तपास सुरू आहे.
जहांगीराबाद पोलीस स्टेशन परिसरातील रामगढी गावातील रसूलपूर चांसी गावात लग्नाच्या वरातीत सामील झालेल्या लोकांची तब्येत रात्री अचानक बिघडली. सुमारे ४० जणांना उलट्या आणि त्रास झाला, त्यापैकी २० रुग्णांना जहांगीराबाद सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं, तर इतरांवर गावात उभारलेल्या आरोग्य शिबिरात उपचार करण्यात आले. मदतीसाठी १८ डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.