५००० पोलीस, १४ गावे! आजवरची सायबर क्राईमविरोधात सर्वात मोठी कारवाई, देशभरात फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 16:14 IST2023-04-28T16:14:15+5:302023-04-28T16:14:43+5:30
हरियाणा पोलिसांच्या प्रवक्त्याने याची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना नूह जिल्ह्यात वेगवेगळ्या भागातून सायबर फ्रॉडशी संबंधीत सूचना मिळाल्या होत्या.

५००० पोलीस, १४ गावे! आजवरची सायबर क्राईमविरोधात सर्वात मोठी कारवाई, देशभरात फसवणूक
हरियाणाच्या नूह जिल्ह्यामध्ये पाय पसरवलिलेल्या सायबर क्राईमविरोधात हरियाणआ पोलिसांनी जबरदस्त मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी जवळपास पाच हजार पोलिसांनी सोळा गावांमध्ये छापे मारले आणि १२५ हॅकर आणि सायबर क्राईमच्या गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे.
या आरोपींकडून वेगवेगळ्या बँकांची एटीएम, स्मार्टफोन, लॅपटॉप, आधार कार्ड आणि एटीएम स्वाईप मशीनसोबत अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. या संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे.
हरियाणा पोलिसांच्या प्रवक्त्याने याची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना नूह जिल्ह्यात वेगवेगळ्या भागातून सायबर फ्रॉडशी संबंधीत सूचना मिळाल्या होत्या. एका खोलीमध्ये बसून काही लोक दुसऱ्या लोकांची बँक खाती रिकामी करत होते. यामुळे तपासात पोलिसांनी सायबर क्राईमचा हॉटस्पॉट एरिया ठरविला आणि या ठिकाणी मोठ्या पोलीस फोर्सद्वारे छापे मारण्यात आले.
ही कारवाई करण्यासाठी, हरियाणा पोलिसांनी 5000 हून अधिक पोलिसांची स्वतंत्र टीम तयार केली होती. 1 एसपी, 6 अतिरिक्त एसपी, 14 डीएसपी आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी सायबर क्राईमविरोधातील मोहिमेत भाग घेतला होता. सायबर ठगांवर ही कारवाई विविध जिल्ह्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या पोलिसांच्या 102 छापा पथकांनी केली. एकाच वेळी या गावांमध्ये छापे मारण्यात आले. रात्री 11.30 वाजता ही मोहीम सुरू झाली, तिचा कालावधी २४ तासांपर्यंत होता.
नईगाव येथून अटक सर्वाधिक म्हणजेच ३१ सायबर गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. लुहिंगा कलान गावातून 25, जयवंत आणि जाखोपूर येथून 20-20, खेडला आणि तिरवडा येथून 17-17 आणि अमीनाबाद आणि इतर गावातून 11 सायबर गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडूव मोठ्या संख्येने फोन, एटीम कार्ड आदी जप्त करण्यात आले आहे.