शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

काँग्रेसमध्ये ५०% आरक्षण; कार्यकारिणीत अर्धी पदे एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याकांना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 05:59 IST

पक्षाचे माजी अध्यक्ष, माजी पंतप्रधानांना स्थायी सदस्यत्व

आदेश रावल लोकमत न्यूज नेटवर्क रायपूर : रायपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेस महाअधिवेशनात शनिवारी प्रमुख सुधारणांचे सहा प्रस्ताव मांडण्यात आले. यावेळी कार्यकारिणीत ५० टक्के आरक्षणाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे, ज्यामध्ये एससी, एसटी, अल्पसंख्याक, महिला, तरुण आणि ओबीसी यांना आरक्षण दिले जाईल, तर ५० टक्के हिस्सा आरक्षित नसेल. 

दुसऱ्या दुरुस्तीमध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांची संख्या २३ वरून ३५ करण्यात आली. यातील १८ सदस्य निवडून येतील आणि १७ सदस्यांना काँग्रेस अध्यक्ष नामनिर्देशित करू शकतील. याशिवाय माजी अध्यक्ष, माजी पंतप्रधान, राज्यसभा आणि लोकसभेतील काँग्रेस नेत्यांना काँग्रेस कार्यकारिणीचे स्थायी सदस्य बनविण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. काँग्रेस प्रथमच डिजिटल मेंबरशिप सुरू करणार आहे. 

२०२५ पासून काँग्रेसचा सर्व डेटा डिजिटल असेल. याशिवाय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्यांच्या संख्येतही सुमारे ४५० सदस्यांची वाढ करण्यात येणार आहे. एकूण नामनिर्देशित सदस्यांची संख्या १५ टक्क्यांवरून २५ टक्के करण्यात आली आहे. ट्रान्सजेंडरसाठीही पक्षाने दरवाजे खुले केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सर्व संस्था काबीज केल्या असून, विरोधकांचा आवाज दाबून ते द्वेषाची आग भडकवीत आहेत. अल्पसंख्याक, दलित, आदिवासी आणि महिलांना भाजप लक्ष्य करीत आहे. भारत जोडो यात्रेने आपल्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला ही बाब आनंददायी होती. १९९८ मध्ये प्रथमच पक्षाचे अध्यक्ष बनणे हे माझे भाग्य होते. या २५ वर्षांत पक्षाने खूप मोठे यश आणि निराशाही पाहिली. सर्वांच्या सहकार्याने आम्हाला बळ मिळाले.         - सोनिया गांधी, ज्येष्ठ नेत्या 

लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी आणि एक ठोस पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी समविचारी पक्षांशी आघाडी करण्यास काँग्रेस इच्छुक आहे. द्वेषाचे वातावरण, महागाई, बेरोजगारी आणि राष्ट्रीय सुरक्षा यांची स्थिती गंभीर आहे. लोकशाही मोडीत काढण्याचे षडयंत्र रचले जात आहे. भारत जोडो यात्रेचा प्रकाश देशभर पसरला आहे. राहुल गांधी यांनी अशक्य ते शक्य करून दाखवले आहे.     - मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

प्रियांका गांधी यांच्या स्वागतासाठी २ किमी रस्त्यावर फुलांचा गालिचा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी छत्तीसगडच्या रायपूरमध्ये दाखल झाल्या. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळाच्या समोरच्या रस्त्यावर फुलांच्या पाकळ्यांचे गालिचे तयार करण्यात आले होते. जवळपास २ किमी रस्ता सजविण्यासाठी ६ हजार किलोपेक्षा अधिक गुलाबाच्या फुलांचा वापर करण्यात आला.  

टॅग्स :congressकाँग्रेस