शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

अभिमानास्पद! ७५ उंबऱ्याच्या गावात ५० आयएएस, आयपीएस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 9:26 AM

गावात जवळपास प्रत्येक घरात नागरी सेवेत एक जण असला तरी गावाची परिस्थिती सुधारलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) अधिकारी इतर राज्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेशमधून सर्वात जास्त असतात. दरवर्षी एक हजारपेक्षा कमी रिक्त जागांसाठी जवळपास १० लाख उमेदवार ही यूपीएससी ही अवघड परीक्षा देतात. उत्तर प्रदेशमध्ये माधोपट्टी (जिल्हा जौनपूर) हे लहानसे गाव. त्याची ओळख आयएएस आणि आयपीएस गाव अशीच आहे. 

माधोपट्टी गावात ७५ घरे असून जवळपास प्रत्येक घरात आयएएस किंवा आयपीएस केडरचा एक सदस्य आहे. या गावात एकूण घरे ७५ पण येथे अधिकाऱ्यांची संख्या ५० पेक्षा जास्त. या गावातील मुले व मुलीच नाही तर सुनादेखील अधिकाऱ्याचे पद सांभाळत आहेत. माधोपट्टी गावाची तुलना गाजीपूरच्या गहमर गावाशी केली जाऊ शकते. माधोपट्टी गावात अनेक लोकांनी नागरी सेवांमध्ये आपले करिअर केले. गावातील काही युवकांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि भाभा अणुशक्ती केंद्रातही  यशस्वी करिअर केले आहे. या गावात चार भावांची निवड आयएएससाठी झाल्याचा विक्रमही आहे.

परंपरा...

- १९५५ मध्ये नागरी सेवा उत्तीर्ण केलेले विनय कुमार सिंह हे बिहारचे मुख्य सचिव म्हणून सेवानिवृत्त झाले. 

- विनय कुमार सिंह यांचे दोन भाऊ छत्रपाल सिंह आणि अजय कुमार सिंह यांनी १९६४ मध्ये ही परीक्षा उत्तीर्ण केली.

- चौथे बंधू शशिकांत सिंह १९६८ मध्ये आयएएस बनले. छत्रपाल सिंह तमिळनाडूचे मुख्य सचिव होते. 

- माधोपट्टी गावात जवळपास प्रत्येक घरात नागरी सेवेत एक जण असला तरी गावाची परिस्थिती सुधारलेली नाही. गावात रस्त्यांवर खड्डे आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश