Red Fort Blast Case: दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणात अटकेत असलेला मुख्य संशयित आरोपी डॉ. आदिल रादर यांचे व्हॉट्सअप चॅट तपास यंत्रणांनी मिळवले आहेत. यातून आदिल पगाराची मागणी करत असलेल्याचे समोर आले आहे. वेळेआधीच पगार खात्यात जमा करा, अशी त्याची मागणी असायची.
एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, आरोपी डॉक्टर आदिल रादर व्हॉट्सअपवरून पैशांची मागणी करत होता. ९ सप्टेंबर रोजी त्याच्या बँक खात्यात १ लाख रुपये जमा झाले होते. त्यानंतर त्याने पुन्हा पैसे मागितले. आदिल म्हणत आहे की, मला आणखी पैसे हवे आहेत.
५ ऑगस्टला बँक खात्यात आले ५ लाख
व्हॉट्सअप चॅटमधून अशी माहिती समोर आली आहे की, ५ ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक खात्यात ५ लाख रुपये पगार जमा झाला होता. त्याआधीही काही रक्कम जमा झाली होती.
त्याने सप्टेंबर मध्ये अनेक वेळा पैशांची मागणी केली. तो नेहमीच पगार जमा होण्याच्या तारखे आधीच पैसे मागायचा. सध्या यंत्रणा या गोष्टीचाही शोध घेत आहेत की, आदिल तारखेच्या आधीच पैसे का मागायचा?
आदिलला सहारनपूरमधून करण्यात आली होती अटक?
डॉक्टर आदिल रादरला जम्मू काश्मीर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून अटक केली होती. आदिलला अटक करण्यात आल्यानंतरच दहशतवाद्यांचे नेटवर्क समोर आले. त्यानंतर पोलिसांनी डॉ. मुजम्मिल आणि शाहीन या दोघांना अटक केली होती.
त्यानंतर फरिदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि २९०० किलो स्फोटके जप्त करण्यात आली होती. त्यांनी देशात घातपात करण्याचा कट रचला होता. त्यासाठी लागणारी शस्त्रास्त्र आणि स्फोटके जमा करण्याची जबाबदारी आदिलकडे होती.
Web Summary : Accused in the Red Fort blast case, Dr. Adil, repeatedly demanded money via WhatsApp, even after a ₹5 lakh deposit. He was arrested in Saharanpur and is linked to a terror network planning attacks.
Web Summary : लाल किला विस्फोट मामले के आरोपी डॉ. आदिल ने 5 लाख रुपये जमा होने के बाद भी व्हाट्सएप के माध्यम से बार-बार पैसे मांगे। वह सहारनपुर में गिरफ्तार हुआ और आतंकी नेटवर्क से जुड़ा है, जो हमलों की योजना बना रहा था।