श्रीनगरमधून 5 किलो IED जप्त, सुरक्षा दलांनी मोठ्या हल्ल्याचा कट उधळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 12:44 IST2021-12-23T12:44:29+5:302021-12-23T12:44:38+5:30
वानपोरा येथे दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना आईडी आढळून आला.

श्रीनगरमधून 5 किलो IED जप्त, सुरक्षा दलांनी मोठ्या हल्ल्याचा कट उधळला
श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांने मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला आहे. शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलाला 5 किलो आयईडी (IED) सापडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका भांड्यात आयईडी ठेवण्यात आला होता. यानंतर बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आयईडी नष्ट केला आहे. आता याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरू करण्यात आला आहे.
दहशतवादी लपल्याची माहिती...
मिळालेल्या माहितीनुसार, वानपोरा येथे दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर पुलवामा पोलीस, 50 आरआर आणि 183 बीएन सीआरपीएफ यांनी संयुक्तपणे शोध मोहीम सुरू केली. शोधादरम्यान रस्त्याच्या कडेला आयईडी पडलेला आढळून आला. त्यानंतर काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. वेळीच कारवाई केल्याने मोठी दुर्घटना टळली.
यापूर्वी 2 किलो आयईडी सापडलो होता
यापुर्वीही सुरक्षा दलांनी महामार्गावर उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील लोलाब भागात दहशतवाद्यांनी पेरलेला आयईडी निष्फळ करुन एक मोठा कट उधळून लावला होता. दहशतवाद्यांनी रस्त्याच्या कडेला दोन किलो वजनाचा आयईडी पेरला होता. विशिष्ट माहितीनंतर लष्कराच्या पथकाने संशयित आयईडी शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू केली होती. त्या मोहिमेत हा आयईडी सापडला होता.