शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 06:57 IST

महाराष्ट्र, गोवा आणि केंद्रशासित प्रदेश दमण-दीव, दादरा आणि नगर हवेलीमधील खासदार व आमदारांवर एकूण ४७८ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई:महाराष्ट्र, गोवा आणि केंद्रशासित प्रदेश दमण-दीव, दादरा आणि नगर हवेलीमधील खासदार व आमदारांवर एकूण ४७८ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली. ही प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याची सूचना न्यायालयाने केली. ४७८ प्रकरणे प्रलंबित खटले असून किमान १३२ प्रकरणांमध्ये न्यायालयांना अद्याप आरोपींची उपस्थिती निश्चित करायची आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या  खंडपीठाला दिली.

४५ प्रकरणांमध्ये न्यायालयाने अन्य अर्जांवर सुनावणी घेत आहेत. १४४ प्रकरणांत पुरावे नोंदविण्याचे काम सुरू आहे; तर ३२ प्रकरणांत युक्तिवाद सुरू आहे. १६ प्रकरणांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे आणि पाच प्रकरणांना जिल्हा न्यायालयाने स्थगिती दिली आहे. प्रकरणांवर जलदगतीने सुनावणी घेण्याच्या उच्च न्यायालयाचे निर्देश संबंधित न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहेत, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली.

न्यायालय काय म्हणाले?

ज्या प्रकरणांमध्ये आरोपी जामिनावर आहे, अशा प्रकरणांमध्ये ट्रायल कोर्टांनी आरोपींना नोटिसा बजावल्या पाहिजेत आणि प्रक्रियेसाठी लवकरात लवकर तारीख निश्चित केली पाहिजे. त्याशिवाय ज्या प्रकरणांत आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले नाहीत, अशा आरोपींवर चार आठवड्यांत आरोप निश्चित करा,  असे निर्देश खंडपीठाने दिले. राज्य सरकारला याचा अहवाल एका महिन्यात देण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी १९ डिसेंबर रोजी ठेवली.

३ महिन्यांत निकाल...

संबंधित न्यायालयाने एका महिन्याच्या आता खटले पूर्ण करावेत आणि निकाल देण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. महाराष्ट्र, गोवा आणि इतर अनेक केंद्रशासित प्रदेशांमधील न्यायालयांना आरोपींचे पुरावे नोंदवण्याच्या प्रक्रियेत अडकलेल्या प्रकरणांमध्ये ३ महिन्यांच्या आत निकाल देण्याची सूचना न्यायालयाने केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Court Orders Swift Resolution of Cases Against Politicians

Web Summary : High Court directs Maharashtra & Goa courts to expedite 478 pending cases against politicians. Courts must notify accused, finalize charges, and prioritize evidence recording. A progress report is due in one month. Trial courts must aim to conclude cases within three months.
टॅग्स :Courtन्यायालयMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण