गोव्यात ४६ लाखांची लूट
By Admin | Updated: August 14, 2015 23:35 IST2015-08-14T23:35:04+5:302015-08-14T23:35:04+5:30
एकावर हल्ला : हल्लेखोरांकडील पिस्तुल घटनास्थळी सापडले

गोव्यात ४६ लाखांची लूट
ए ावर हल्ला : हल्लेखोरांकडील पिस्तुल घटनास्थळी सापडलेमडगाव : रेपरावाडा-बाणावली येथे गुरुवारी रात्री अज्ञातांनी सय्यद आदम (४३) यांच्यावर हल्ला करून त्यांची ४६ लाखांची रोकड असलेली बॅग लंपास केल्याची घटना घडली. हल्लेखोरांजवळ पिस्तुल घटनास्थळीच सापडले.आदम हे शेख गौस यांच्याकडे कामाला असून गौस यांचा बाणावलीत मनी एक्सचेंजचा व्यवसाय आहे. रात्री पैसे घरी ठेवण्यासाठी घेऊन जात असताना हा हल्ला झाला. कोलवा पोलिसांनी या प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा नोंद केला आहे. (प्रतिनिधी)