४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 06:32 IST2025-10-01T06:31:56+5:302025-10-01T06:32:29+5:30
पती अन् नातेवाइकांकडून सर्वाधिक छळ; लग्नासाठी अपहरण आणि पळून जाण्याच्या, सायबर गुन्ह्यांच्या घटनांत मोठी वाढ

४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
देशात २०२३ मध्ये महिलांवरील अत्याचाराची ४.४८ लाखहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली असून, यात सातत्याने वाढ होत आहे. पती/नातेवाइकांकडून छळ (१.३३ लाख) आणिअपहरण (८८ हजार) हे सर्वाधिक गुन्हे आहेत. लग्नासाठी अपहरण होण्याच्या प्रमाणात ५.६% वाढ झाली आहे. तेलंगणा सर्वाधिक महिला-अत्याचार दर (१२४.९) असलेले राज्य ठरले आहे.
महिलांवरील अत्याचार प्रकरणे
२०२३ - ४,४८,२११
२०२२ - ४,४५,२५६
२०२१ - ४,२८,२७८
गेल्या तीन वर्षात देशभरात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.
महिलांचा छळ कसा?
गुन्ह्याचा प्रकार प्रकरणे
पती/नातेवाइकांकडून छळ १,३३,६७६
अपहरण / किडनॅपिंग ८८,६०५
महिलांशी गैरवर्तन ८३,८९१
बलात्कार २९,६७०
हुंडाबळी ६,१५६
आत्महत्येस प्रवृत्त करणे ४,८२५
महिलांवर अश्लील टिप्पणी ८,८२३
बलात्काराचा प्रयत्न २,७९६
अॅसिड हल्ले ११३
लग्नासाठी अपहरण होण्याच्या प्रमाणात ६% वाढ
देशात २०२३ मध्ये अपहरण आणि अपहरणाशी संबंधित तब्बल १.१३ लाख प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यात सर्वाधिक घटना लग्नासाठी अपहरण आणि पळून जाण्याच्या स्वरूपाच्या आहेत. एकूण १७,८०० प्रकरणे पळून जाण्याची होती, ज्यात ९,००० मुले आणि ८,८०० प्रौढ होते. तसेच १६,८६६ मुले आणि १५,७९० प्रौढांचे लग्नासाठी अपहरण झाले. २०२२ च्या तुलनेत या घटनांत ५.६ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे समोर येते.
महिला सर्वाधिक टार्गेटवर कुठे ?
राज्य दर
तेलंगणा १२४.९
राजस्थान ११४.८
ओडिशा ११२.४
हरयाणा ११०.३
केरळ ८६.१
बलात्कार प्रकरणे
१८+ महिला - २८,८२१
मुली - ८४९
अनुसूचित जमातींवरील हल्ल्यांत २९ टक्के वाढ
देशात २०२३ मध्ये २७,७२१ खुनांची नोंद झाली असून ती २०२२ च्या तुलनेत २.८ टक्क्यांनी कमी आहे. मात्र, सायबर गुन्ह्यांत ३१.२ टक्के वाढ झाली आहे, तर अनुसूचित जमातींवरील (एसटी) गुन्ह्यांत तब्बल २८.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. खुनांच्या घटना २०२२ मध्ये २८,५२२ तर २०२३ मध्ये २७,७२१ घडल्या आहेत.
अपहरणाची प्रकरणे
वर्ष एकूण प्रकरणे %
२०२२ १,०७,५८८
२०२३ १,१३,५६४
परत किती आले ?
स्थिती संख्या
एकूण पीडित १,४०,८१३
जिवंत परतलेले १,३९,१६४
मृत सापडलेले १,६४९
न सापडलेले ६६,२६८
ज्येष्ठ नागरिक टार्गेटवर
२०२३ मध्ये ज्येष्ठ नागरिकांविरोधातील एकूण २७,८८६ गुन्ह्यांची नोंद झाली असून २०२२ मधील २८,५४५ गुन्ह्यांच्या तुलनेत त्यात किंचित घट झाली आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. १०४ ज्येष्ठांवर बलात्कार करण्यात आला आहे.