शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 13:06 IST

Vande Bharat Express News: वंदे भारत ट्रेन दिवसेंदिवस देशभरात अधिक लोकप्रिय होत चालली आहे. अधिक तिकीट दर असूनही, प्रवासी संख्येत मोठी वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे.

Vande Bharat Express News: आताच्या घडीला वंदे भारत ट्रेन भारतीय रेल्वेची सर्वांत लोकप्रिय असलेली ट्रेन आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार नव्या वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण केले. यानंतर आता देशभरातील वंदे भारत ट्रेनच्या सेवा १६० वर पोहोचल्या असल्याचे म्हटले जात आहे. अशातच एक वंदे भारत ट्रेनने रेकॉर्डब्रेक कामगिरी करत नवा इतिहास घडवला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान आणि दिल्ली दरम्यान जलद सुरक्षित आणि आरामदायी प्रवासात एक नवा अध्याय लिहिणारी जोधपूर-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांमध्ये लोकप्रिय झाली आहे. जास्त भाडे श्रेणी असूनही, ही ट्रेन लोकप्रियतेचे नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. जोधपूर-दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस ही सेमी हायस्पीड एक्सप्रेस तिचा वेग, वक्तशीरपणा आणि अत्याधुनिक सुविधांमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवत आहे. या ट्रेनने राजस्थान आणि दिल्लीमधील कनेक्टिव्हिटीला एका नवीन स्तरावर नेले आहे.

ट्रेनची वाढती मागणी स्पष्ट होते

२७ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत फक्त ४२ फेऱ्यांमध्ये ५९ हजारांहून अधिक प्रवाशांनी या वंदे भारत ट्रेनने प्रवास केला, ज्यामुळे रेल्वेला ६.२१ कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला. दिल्लीकडून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे तीन हजारांनी जास्त आहे, यावरून ट्रेनची वाढती मागणी स्पष्ट होते, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  ही ट्रेन मेडता रोड, डेगाना, मकराना, फुलेरा, जयपूर, अलवर, रेवाडी आणि गुडगाव सारख्या प्रमुख स्थानकांवर थांबते आणि अंदाजे ६०४-६२० किमी अंतर फक्त ८ तास ५ मिनिटांत पार करते.

दरम्यान, ही वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन प्रवाशांना आरामदायी सुविधा, जागा, पूर्णपणे वातानुकूलित डबे, स्वयंचलित दरवाजे, जीपीएस-आधारित माहिती प्रणाली आणि उच्च दर्जाची ऑनबोर्ड सेवा देते. ही ट्रेन भारतीय अभियांत्रिकीची उत्कृष्ट नमुना आहे, जी राजस्थान आणि दिल्ली दरम्यानच्या रेल्वे प्रवासात आधुनिकता, आराम आणि वेगवान जलद प्रवास यांची सांगड घालते, असेही सांगितले गेले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Vande Bharat Express: Record-breaking performance with high passenger numbers and earnings.

Web Summary : The Jodhpur-Delhi Vande Bharat Express is gaining popularity for speed and comfort. In 42 trips, it carried 59,000 passengers, earning ₹6.21 crore. Passengers prefer this modern, convenient travel option.
टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेTravel Tipsट्रॅव्हल टिप्सpassengerप्रवासीRailway Passengerरेल्वे प्रवासीbusinessव्यवसाय