सहाराश्री सुब्रतो रॉय यांना 4 आठवड्यांचा पॅरोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2016 18:09 IST2016-05-06T18:09:08+5:302016-05-06T18:09:08+5:30
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अटकेत असलेले सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सुप्रीम कोर्टानं 4 आठवड्यांचा पॅरोल मंजूर केला आहे.

सहाराश्री सुब्रतो रॉय यांना 4 आठवड्यांचा पॅरोल
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6- बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अटकेत असलेले सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सुप्रीम कोर्टानं 4 आठवड्यांचा पॅरोल मंजूर केला आहे. आईच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.
मात्र सुप्रीम कोर्टानं पोलिसांना साध्या गणवेशात त्यांच्या सोबत राहण्याचे आदेश दिले आहेत. संकटात सापडलेले उद्योगपती सुब्रतो रॉय यांच्या मातोश्री छवी राय यांचं प्रदीर्घ आजारानं गुरुवारी निधन झालं.
सुब्रतो रॉय यांच्या मातोश्री 95 वर्षांच्या होत्यात. मात्र मागील दोन वर्षांपासून त्या गंभीर स्वरूपात आजारी होत्या. गुरुवारी रात्री 1 वाजून 34 मिनिटांनी त्यांचं निधन झालं. सेबीसोबत झालेल्या वादानंतर 4 मार्च 2014पासून म्हणजेच गेल्या दोन वर्षांपासून सुब्रतो रॉय जेलमध्ये आहेत.