जम्मू-काश्मीरमधील हंदवाडामध्ये चकमक सुरुच; दहशतवादी लपल्याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 09:06 IST2019-03-03T09:03:57+5:302019-03-03T09:06:57+5:30

जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा आणि बाबागुंड परिसरात सलग तिसऱ्या दिवशी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. या चकमकीत चार जवान शहीद झाले असून नऊ जवान जखमी झाले आहेत.

4 Security Personnel, 1 Civilian Killed In Encounter In Jammu And Kashmir | जम्मू-काश्मीरमधील हंदवाडामध्ये चकमक सुरुच; दहशतवादी लपल्याची माहिती

जम्मू-काश्मीरमधील हंदवाडामध्ये चकमक सुरुच; दहशतवादी लपल्याची माहिती

ठळक मुद्देसलग तिसऱ्या दिवशी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. या चकमकीत चार जवान शहीद झाले असून नऊ जवान जखमी झाले आहेत.सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे.

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा आणि बाबागुंड परिसरात सलग तिसऱ्या दिवशी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. या चकमकीत चार जवान शहीद झाले असून नऊ जवान जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हंदवाडा परिसरात गेल्या गुरुवारपासून सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. या परिसरात दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, परिसराला सुरक्षा दलाच्या जवानांनी वेढा घातला असून शोधमोहीम सुरु आहे. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत चार जवान शहीद झाले असून नऊ जवान जखमी झाले आहेत. या चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील दोन कर्मचारी शहीद झाले आहेत. तर नऊ जवान जखमी झाले असून यामध्ये दोन सीआरपीएफचे जवान आहेत आणि सात लष्कराचे जवान आहेत.


जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळांवर भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येते. या कारवाईनंतर भारत- पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे.
  
 

Web Title: 4 Security Personnel, 1 Civilian Killed In Encounter In Jammu And Kashmir