शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Video : इंफाळमध्ये आयईडी स्फोट; 4 पोलीस आणि एक नागरिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 13:23 IST

मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये मंगळवारी सकाळी आयईडी स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देमणिपूरची राजधानी इंफाळमध्ये मंगळवारी सकाळी आयईडी स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.स्फोटात चार पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक जखमी झाले आहेत.इंफाळच्या थंगल बाजारातील शनि मंदिराजवळ हा स्फोट झाला.

इंफाळ - मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये मंगळवारी सकाळी आयईडी स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटात पाच जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये चार पोलीस कर्मचारी आणि एका नागरिकाचा समावेश आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

मिळलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (5 नोव्हेंबर) सकाळी 9.30 च्या सुमारास मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये आयईडी स्फोट झाला. इंफाळच्या थंगल बाजारातील शनि मंदिराजवळ हा स्फोट झाला आहे. या स्फोटात चार पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इंफाळमधील हा परिसर हाय सिक्युरिटी असणारा समजला जातो. कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्याप या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही. याआधी काही दिवसांपूर्वी तेलीपाटी परिसरात एक स्फोट झाला होता. त्यामध्ये बीएसएफचे तीन जवान जखमी झाले होते.

जम्मू - काश्मीरमध्ये सोमवारी (4 नोव्हेंबर) दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. श्रीनगरच्या मौलाना आझाद मार्गावरील बाजारात झालेल्या या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर 15 जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी भरगर्दी असलेल्या बाजारात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. सैन्य दल आणि पोलिसांकडून हल्ला घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी संयुक्त मोहीम राबविण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसांत दहशतवाद्यांनी केलेला हा दुसरा हल्ला आहे.

जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये देखील याआधी दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 20 जण जखमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथील हॉटेल प्लाझाजवळ दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात 20 नागरिक जखमी झाले. त्यातील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच याआधी श्रीनगरमधील करणनगर परिसरात सीआरपीएफ आणि पोलीस यांच्या संयुक्त पेट्रोलिंग पार्टीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळीही दहशतवाद्यांनी  जवानांवर ग्रेनेड फेकले होते. हा हल्ला संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास करण्यात आला होता.  यात सहा सीआरपीएफचे जवान जखमी झाले होते. 

 

टॅग्स :PoliceपोलिसTerror Attackदहशतवादी हल्ला