शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

जम्मू काश्मीरमध्ये मारला गेला 4 फूट उंचीचा खतरनाक दहशतवादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 16:08 IST

जम्मू काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदचा चार फुटांची उंची असणारा मोहम्मद तंत्रे उर्फ 'छोटा नूर' या दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे. पुलवामा जिल्ह्यात जवानांसोबत झालेल्या चकमकीत नूर मोहम्मद तंत्रे मारला गेला.

ठळक मुद्देजम्मू काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदचा चार फुटांची उंची असणारा मोहम्मद तंत्रे उर्फ 'छोटा नूर' ठारपुलवामा जिल्ह्यात जवानांसोबत झालेल्या चकमकीत नूर मोहम्मद तंत्रे मारला गेलागेल्या सहा महिन्यांपासून नूर मोहम्मद तंत्रेने भारतीय लष्कराच्या जवानांनी झोप उडवली होती

श्रीनगर -  जम्मू काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदचा चार फुटांची उंची असणारा मोहम्मद तंत्रे उर्फ 'छोटा नूर' या दहशतवाद्याला ठार करण्यात आलं आहे. पुलवामा जिल्ह्यात जवानांसोबत झालेल्या चकमकीत नूर मोहम्मद तंत्रे मारला गेला. गेल्या सहा महिन्यांपासून नूर मोहम्मद तंत्रेने भारतीय लष्कराच्या जवानांनी झोप उडवली होती. अखेर त्याचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश मिळालं आहे. नूर मोहम्मद तंत्रेचा खात्मा होणे भारतीय लष्करासाठी मोठं यश असल्याचं मानलं जात आहे.  दक्षिण आणि मध्य काश्मीरमधील दहशतवादी कारवायांसाठी नूर मोहम्मद तंत्रे जबाबदार होता. तो ठार झाल्याने दहशतवादी संघटनेला मोठा धक्का बसला असल्याचं सांगितलं जात आहे. नूर मोहम्मद आपल्या साथीदारांसोबत श्रीनगर - जम्मू हायवेवर पथकावर हल्ला करण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच जवानांना त्याला ठार करत यश मिळवलं आहे. 

जम्मू काश्मीरमधील हा चार फूट उंचीचा दहशतवादी मोठी समस्या बनला होता. गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी कारवायांमागे 'जैश-ए- मोहम्मद'चा नूर मोहम्मद तंत्रेचा हात असल्याचे माहिती समोर आली होती. पुलवामा जिल्ह्यातील त्रालच्या नूर मोहम्मदनं दक्षिण काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदची कमान सांभाळली होती. तंत्रेला 2003मध्ये दिल्लीतून अटक करण्यात आली होती आणि पीओटीए कोर्टानं त्याला 2011मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यादरम्यान मिळालेल्या पॅरोलवर नूर मोहम्मदनं पळ काढला आणि पुन्हा तो दहशतवादी संघटना जैश-ए- मोहम्मदमध्ये सहभागी झाला.  ''नूर मोहम्मद तंत्रे यावेळी जैश-ए-मोहम्मदमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. काश्मीरमध्ये घडणा-या दहशतवादी घटनांमागे नूर मोहम्मद आणि  कमांडर मुफ्ती वकासची प्रमुख भूमिका आहे', अशी माहिती त्यावेळी पोलिसांनी दिली होती. 

तंत्रेनं जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचे समर्थन केले होते ज्यांनी ऑगस्ट महिन्यात पुलवामा जिल्ह्यात पोलीस लाईनवर हल्ला केला होता. ऑगस्ट महिन्यात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात 8 सुरक्षा रक्षक शहीद झाले होते तर यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.  याशिवाय, 3 ऑक्टोबरला श्रीनगर इंटरनॅशनल एअरपोर्टबाहेर बीएसएफ कॅम्पवर करण्यात आलेल्या हल्ल्यामागेही नूर मोहम्मदचा हात असल्याचं बोललं जात होतं. या हल्ल्यात एक बीएसएफ अधिकारी शहीद झाला होता तर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. 

जानेवारी 2011मध्ये दिल्लीच्या पीओटी कोर्टनं नूर मोहम्मद तंत्रेसहीत अन्य चार जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दिल्लीतील तिहार जेलमध्ये काही काळ शिक्षा भोगल्यानंतर त्याची रवानगी श्रीनगरच्या जेलमध्ये करण्यात आली. यावेळी 2015मध्ये मोहम्मदला काही दिवसांच्या पॅरोलवर सोडण्यात आले, यामध्ये जम्मू काश्मीर हाय-कोर्टानं कित्येकदा वाढदेखील केली. पॅरोलच्या जवळपास तीन महिन्यानंतर मोहम्मद अंडरग्राऊंड झाल्याची माहिती समोर आली. 

दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून 'ऑपरेशन ऑल आउट' सुरू करण्यात आले असून या अंतर्गत 203 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गेल्या 3 वर्षांतील ही आकडेवारी सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे.  यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 2017मध्ये जम्मू काश्मीरमध्ये 10 डिसेंबरपर्यंत 203 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे तर 2016 मध्ये 148 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता व 2015 मध्ये 108 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. 

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीर