रेडिएशनशिवाय होणार हृदयाचे ३डी मॅपिंग; अनियमित ठोक्यांच्या विकारावर प्रभावी उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:27 IST2025-04-17T16:27:45+5:302025-04-17T16:27:45+5:30

देशात सुमारे ५ टक्के लोक हृदयाच्या अनियमित ठोक्यांचा गंभीर आजार ‘अरिद्मिया’ने ग्रस्त

3D mapping of the heart will be done without radiation effective treatment for irregular heartbeat disorder | रेडिएशनशिवाय होणार हृदयाचे ३डी मॅपिंग; अनियमित ठोक्यांच्या विकारावर प्रभावी उपचार

रेडिएशनशिवाय होणार हृदयाचे ३डी मॅपिंग; अनियमित ठोक्यांच्या विकारावर प्रभावी उपचार

जितेंद्र प्रधान

जयपूर : देशात सुमारे ५ टक्के लोक हृदयाच्या अनियमित ठोक्यांचा गंभीर आजार ‘अरिद्मिया’ने ग्रस्त आहेत. विविध वैद्यकीय अहवालांनुसार, यातील ११ टक्के पुरुष व ९ टक्के महिलांचा मृत्यू या आजारामुळे होतो. त्यावर जयपूरमध्ये  इनसाइट एक्स या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तम उपचार करणे शक्य होणार आहे. ते हृदयाच्या ठोक्यांशी संबंधित गुंतागुंतीच्या आजारांचे केवळ अचूक निदानच करत नाही, तर कोणत्याही रेडिएशनशिवाय कमी वेळेत व उपचारदेखील करते. 

जयपूरच्या इटर्नल हॉस्पिटलमध्ये राजस्थानची पहिली अत्याधुनिक इलेक्ट्रोफिजिओलॉजी लॅब सुरू झाली असून तिथे हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. 

इटर्नल हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाचे चेअरमन डॉ. जितेंद्र सिंग मक्कड यांनी सांगितले की, हृदयात जिथून अनियमित ठोके निर्माण होतात ते स्थान इनसाइट एक्स तंत्रज्ञानामुळे अचूकरीत्या समजते. हे तंत्रज्ञान विशेषतः एट्रियल फिब्रिलेशन, वेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया आणि एट्रियल फ्लटर यासारख्या आजारांमध्ये खूप प्रभावी ठरत आहे.

‘जागतिक दर्जाच्या सुविधा’

इटर्नल हॉस्पिटलच्या को-चेअरपर्सन मंजू शर्मा म्हणाल्या की, राजस्थानच्या जनतेला जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

इलेक्ट्रोफिजिओलॉजी लॅब हे त्या दिशेने आम्ही उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. मेडिकल डायरेक्टर डॉ. मनमीत मक्कड यांनी सांगितले की, हे तंत्रज्ञान  आमच्यासाठी एक व्हिजन आहे. 

रेडिएशनचा वापर नसल्याने गर्भवतींसाठी सुरक्षित

इटर्नल हॉस्पिटलचे डायरेक्टर (इलेक्ट्रोफिजिओलॉजी व हार्ट फेल्युअर ) डॉ. कुश कुमार भगत यांनी सांगितले, इनसाइट एक्स तंत्रज्ञानामुळे कोणत्याही रेडिएशन शिवाय ३डी मॅपिंग करू शकतो. विशेषतः गर्भवतींसाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरत आहे.

भारतात २ टक्के गरोदर स्त्रियांमध्ये अरिद्मियाची समस्या दिसून येते. आता आम्ही त्यांच्यावर कोणत्याही जोखमीशिवाय यशस्वी उपचार करू शकतो.

Web Title: 3D mapping of the heart will be done without radiation effective treatment for irregular heartbeat disorder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.