३९ कोटी रुपये घरप˜ी वसूल महापालिका : पाणीप˜ीतून साडेआठ कोटींचा महसूल

By Admin | Updated: August 11, 2015 22:11 IST2015-08-11T22:11:39+5:302015-08-11T22:11:39+5:30

नाशिक : राज्य शासनाने ५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवरील एलबीटी रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर महापालिकेने उत्पन्नाचा मोठा स्त्रोत असलेल्या घरप˜ी-पाणीप˜ीच्या वसुलीकडे लक्ष केंद्रित केले असून, एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत घरप˜ीच्या माध्यमातून ३९ कोटी ६४ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. दरम्यान, पाणीप˜ीतूनही ८ कोटी ४० लाखांचा महसूल पालिकेच्या खजिन्यात जमा झाला असून, येत्या आठ दिवसांत सर्व नळजोडणीधारकांना पाणीप˜ीची बिले वितरित करण्याचे आदेश उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी विभागीय अधिकार्‍यांना दिले आहेत.

39 crores of rupees to recover the house: Municipal Corporation revenue of Revenue of Rs. 8 crores | ३९ कोटी रुपये घरप˜ी वसूल महापालिका : पाणीप˜ीतून साडेआठ कोटींचा महसूल

३९ कोटी रुपये घरप˜ी वसूल महापालिका : पाणीप˜ीतून साडेआठ कोटींचा महसूल

शिक : राज्य शासनाने ५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवरील एलबीटी रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर महापालिकेने उत्पन्नाचा मोठा स्त्रोत असलेल्या घरप˜ी-पाणीप˜ीच्या वसुलीकडे लक्ष केंद्रित केले असून, एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत घरप˜ीच्या माध्यमातून ३९ कोटी ६४ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. दरम्यान, पाणीप˜ीतूनही ८ कोटी ४० लाखांचा महसूल पालिकेच्या खजिन्यात जमा झाला असून, येत्या आठ दिवसांत सर्व नळजोडणीधारकांना पाणीप˜ीची बिले वितरित करण्याचे आदेश उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी विभागीय अधिकार्‍यांना दिले आहेत.
महापालिकेने घरप˜ी वसुलीसाठी थकबाकीदारांबरोबरच रडारवर नसलेल्या मिळकतींचाही शोध घेण्याची मोहीम आखली आहे. घरप˜ीच्या माध्यमातून महसुलात वाढ होण्यासाठी महापालिकेने चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीकरिता मिळकतधारकांसाठी सवलत योजना राबविली होती. या सवलत योजनेला मिळकतधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. शिवाय महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन करभरणालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. एप्रिल महिन्यात बिलावर पाच टक्के सूट देण्यात आली होती. त्यामुळे पालिकेला एप्रिलमध्ये ११ कोटी १७ लाख २९ हजार रुपयांचा महसूल मिळाला. मे महिन्यात तीन टक्के सूट दिल्याने नऊ कोटी ८१ लाख ७७ हजारांचा महसूल मनपाच्या खजिन्यात जमा झाला, तर जून महिन्यात दोन टक्के सवलत योजनेमुळे दहा कोटी १२ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली. सवलत योजनेनंतर जुलै महिन्यात महापालिकेला ७ कोटी ३७ लाख ९८ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. या महिन्यात सवलत योजनेच्या तुलनेत महसुलात घट झालेली असली तरी पालिकेने आता थकबाकीदार व करबुडव्या मिळकतींचा शोध घेण्यास सुरुवात केली असून, संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
इन्फो
घरप˜ीच्या बिलांचे सर्व विभागांमध्ये वाटप जवळपास पूर्ण झाले आहे, तर पाणीप˜ीची बिले येत्या आठ दिवसांत वितरित करण्याच्या सूचना सर्व विभागीय अधिकार्‍यांना दिल्या आहेत. ऑगस्टअखेर बिलांचे वाटप होईल. घरप˜ी व पाणीप˜ीच्या वसुलीबाबत काही योजनाही आखल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू होईल.
- रोहिदास दोरकुळकर, उपआयुक्त, मनपा

Web Title: 39 crores of rupees to recover the house: Municipal Corporation revenue of Revenue of Rs. 8 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.