एक वर्षात ३८० नक्षली ठार, १०४५ जणांनी आत्मसमर्पण केले; गृहमंत्री अमित शहांची राज्यसभेत माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 17:23 IST2025-03-21T17:08:44+5:302025-03-21T17:23:56+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत नक्षवाद्यांची माहिती दिली.

एक वर्षात ३८० नक्षली ठार, १०४५ जणांनी आत्मसमर्पण केले; गृहमंत्री अमित शहांची राज्यसभेत माहिती
आज राज्यसभेत गृह मंत्रालयाच्या कामकाजावर चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माहिती दिली. ईशान्येकडील राज्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना कमी झाल्या आहेत. गृहमंत्र्यांनी नक्षलवाद्यांना संपवण्याच्या आपल्या वचनाचा पुनरुच्चार केला. एका वर्षात २६१९ नक्षलवादी कमी झाले आहेत. एका वर्षात ३८० नक्षलवाद्यांना मारले आहे. आता फक्त १२ जिल्हे नक्षलग्रस्त आहेत, असंही अमित शाह म्हणाले.
"१०४५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. नक्षलवाद्यांच्या आर्थिक मदतकर्त्याचा खात्मा आम्ही केला आहे, असेही शाह म्हणाले.
ट्रम्प संतापले! चीनविरोधात अमेरिकेनं उचललं कठोर पाऊल; जागतिक पडसाद उमटणार?
शाह म्हणाले की, आमच्या सरकारने अतिरेकीपणा, दहशतवाद आणि नक्षलवादाला धक्का दिला आहे. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या प्रगतीचाही त्यांनी उल्लेख केला. गृहमंत्र्यांनी काश्मीरमधील कलम ३७० हे वेगळे होण्याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले.
शाह म्हणाले की, कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवादाच्या घटना कमी झाल्या आहेत. दगडफेकही थांबली आहे. २०२४ मध्ये काश्मीरमध्ये दगडफेकीची एकही घटना घडलेली नाही.
"आम्ही काश्मीरमध्ये बंद असलेले चित्रपटगृहे उघडली. तिथे G-20 बैठक आयोजित करण्यात आली होती. आम्ही पठाणकोटमधील चेकपोस्ट परवाना रद्द केला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये भ्रष्टाचार विरोधी ब्युरोची स्थापना करण्यात आली. पूर्वीच्या सरकारांचा दृष्टिकोन शिथिल होता आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी कोणताही कायदा नव्हता, असंही अमित शाह म्हणाले.
अमित शाह म्हणाले की, आता काश्मीरमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण जवळजवळ शून्य आहे. पूर्वी दहशतवाद्यांच्या मृत्यूवर मिरवणुका काढल्या जात होत्या. पण आमच्या सरकारने ते बंद केले. उरी हल्ल्याचा बदला १० दिवसांत घेण्यात आला. दहशतवाद्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकऱ्या देणे बंद केले.