शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

राज्यातील ३६ खासदारांची मराठीतून शपथ; शपथ घेताना घडले मजेदार किस्से, वाचा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 09:13 IST

९ जणांनी हिंदीत, तर तिघांनी घेतली इंग्रजीत शपथ; शपथ घेताना घडले मजेदार किस्से; आज होणार घमासान?

नवी दिल्ली: लोकसभेच्या विशेष अधिवेशनात सभागृहाचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित खामदारांना शपथ देण्यात आली. मागील २ दिवसांत महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी संसदेत शपथ घेतली. यातील बहुसंख्य खासदारांनी मातृभाषा मराठीत शपथ घेतली तर काही खासदारांनी इंग्रजी आणि हिंदी भाषेत शपथ घेतली. राज्यातील ४८. खासदारांपैकी ३६ खासदारांनी मराठी भाषेत संसदेत शपथ घेतली. तर ९ खासदारांनी हिंदी भाषेत आणि ३ खासदारांनी इंग्रजी भाषेत सपथ घेतली. 

बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेताच हंगामी अध्यक्षांनी रोखलेउद्धवसेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश बापूराव पाटील आष्टीकर यांनी मंगळवारी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेताना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबजी ठाकरे' असा उल्लेख केला. लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी 'ऐका... तसे करू नका. तुमच्यापुढे जे (प्रतिज्ञापत्र) (प्रतिज्ञापत्र) ठेपले ठेवले आहे, ते मराठीत आहे. तेवढेच वाचा, असे निर्देश दिले. त्यानंतर आष्टीकर यांनी लोकसभा सचिवालयाने व्यासपीठावर ठेवलेले प्रतिज्ञापत्र वाचून दाखवत शपथ घेतली.

नीलेश लंकेंची थेट इंग्रजीतून शपथसोमवारी २६२ खासदारांनी पहिल्या दिवशी सदस्यत्त्वाची शपथ घेतली. त्यानंतर मंगळवारी उर्वरित खासदारांचा शपथविधी झाला. नव्या लोकसभेचे चित्र बरेचसे बदलल्यानंतर उत्साहाच्या वातावरणात शपथविधी पार पडला. त्यात शरद पवार गटातील अहमदनगरचे खासदार नीलेश लंके यांनी इंग्रजीत शपथ घेऊन लक्ष वेधून घेतले. नीलेश लंके यांनी इंग्रजीतून सदस्यत्त्वाची शपथ घेतल्यानंतर जय हिंद, जय महाराष्ट्र, राम कृष्ण हरी असा शेवट केला. प्रचारात सुजय विखे यांनी लंकेंना त्यांच्यासारखे इंग्रजी बोलून दाखवल्यास निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेईन, असे उघड उघड आव्हान दिले होते. त्यातूनच त्यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्याची चर्चा होत आहे.

नेमकी कुणी घेतली कोणत्या भाषेत शपथ?काँग्रेस छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर - मराठीशोभा बच्छाव, धुळे - मराठीबळवंत वानखेडे, अमरावती - मराठीप्रतिभा धानोरकर, चंद्रपूर - मराठीकल्याण काळे, जालना - मराठीवसंत चव्हाण, नांदेड - मराठीवर्षा गायकवाड, मुंबई उत्तर मध्य - मराठीशिवाजी कालगे, लातूर - मराठीप्रणिती शिंदे, सोलापूर - हिंदीगोवाल पाडवी, नंदूरबार - हिंदीश्यामकुमार बर्वे, रामटेक - हिंदीडॉ. प्रशांत पडोळे, भंडारा-गोंदिया - हिंदीनामदेव किरसान, गडचिरोली-चिमूर - इंग्रजी

भाजपछत्रपती उदयनराजे भोसले, सातारा - मराठीमुरलीधर मोहोळ, पुणे - मराठीरक्षा खडसे, रावेर - मराठीस्मिता वाघ, जळगाव - मराठीनारायण राणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग - हिंदीअनुप धोत्रे, अकोला - हिंदीपीयूष गोयल, उत्तर मुंबई - हिंदीनितीन गडकरी, नागपूर - हिंदीहेमंत सावरा, पालघर - इंग्रजी

उद्धवसेनासंजय देशमुख, यवतमाळ वाशिम - मराठीनागेश पाटील आष्टीकर, हिंगोली - मराठीसंजय जाधव, परभणी - मराठीराजाभाऊ वाजे, नाशिक - मराठीसंजय दिना पाटील, ईशान्य मुंबई - मराठीअनिल देसाई, दक्षिण मध्य मुंबई - मराठीअरविंद सावंत, दक्षिण मुंबई - मराठीभाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी - मराठीओमराजे निंबाळकर, धाराशिव - मराठी

शरद पवार गटअमर काळे, वर्धा- मराठीभास्कर भगरे, दिंडोरी - मराठीसुरेश म्हात्रे (बाळ्या मामा), भिवंडी - मराठीबजरंग सोनावणे, बीड - मराठीसुप्रिया सुळे, बारामती - मराठीअमोल कोल्हे, शिरूर - मराठीध्यैर्यशील मोहिते पाटील, म्हाडा - मराठीनीलेश लंके, अहमदनगर - इंग्रजी

शिंदेसेनाप्रतापराव जाधव, बुलढाणा - मराठीसंदीपान भुमरे, छत्रपती संभाजीनगर - मराठीश्रीकांत शिंदे, कल्याण - मराठीनरेश म्हस्के, ठाणे - मराठीरवींद्र वायकर, मुंबई उत्तर पश्चिम - मराठीश्रीरंग बारणे, मावळ - मराठीधैर्यशील माने, हातकणंगले- मराठी

अजित पवार गटसुनील तटकरे, रायगड - मराठी

अपक्षविशाल पाटील, सांगली - हिंदी

टॅग्स :lok sabhaलोकसभाMaharashtraमहाराष्ट्रmarathiमराठीMember of parliamentखासदार