छत्तीसगडउच्च न्यायालयाने पती-पत्नीच्या नात्याबाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. लग्नाच्या ३५ वर्षांनंतर छळाचा आरोप करत घटस्फोट मागणाऱ्या पतीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. "इतक्या जुन्या वैवाहिक संबंधांमध्ये क्रूरता आणि त्याग सिद्ध करण्यासाठी केवळ अंदाज किंवा सामान्य आरोप पुरेसे नाहीत, तर त्यासाठी ठोस पुराव्यांची गरज आहे," असे निरीक्षण न्यायमूर्ती संजय अग्रवाल आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार वर्मा यांनी नोंदविले. बेमेतरा येथील जिल्हा कौटुंबिक न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवत उच्च न्यायालयाने हा निकाल दिला.
काय आहे नेमके प्रकरण?
बेमेतरा जिल्ह्यातील रहिवासी व पुजारी असलेले गिरिधर दुबे यांनी ३५ वर्षांपूर्वी विवाह केला. दुबे यांनी कौटुंबिक न्यायालयात धाव घेत दावा केला की, त्यांची पत्नी अत्यंत भांडखोर असून, गेल्या १५ वर्षांपासून त्यांना सोडून मुलगी आणि जावयाकडे राहत आहे. पत्नीने मानसिक छळ केल्याचा आरोप करत त्यांनी घटस्फोटाची मागणी केली होती.
पत्नीने मांडली आपली व्यथा
घटस्फोटाच्या याचिकेला विरोध करताना पत्नीने आरोप केला की, पती नेहमी चारित्र्यावर संशय घेत असे व मारहाण-शिवीगाळ करत असे."मला रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास आहे. पण पतीने कधीही माझ्या उपचाराचा खर्च उचलला नाही. अशा परिस्थितीत हतबल होऊन मला मुलीच्या घरी आश्रय घ्यावा लागला."
हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण आणि निकाल
- पत्नी पतीपासून वेगळी राहते म्हणजे तिने पतीचा त्याग केला, असे मानणे चुकीचे आहे. जर पत्नीकडे वेगळे राहण्याचे ठोस कारण असेल, तर तो आधार घटस्फोटासाठी पुरेसा ठरत नाही. - पतीने केलेले क्रूरतेचे आरोप अत्यंत अस्पष्ट आणि सामान्य स्वरूपाचे होते, पतीच्या साक्षीदारांचे जबाबही विश्वसनीय आढळले नाहीत. - महिला समुपदेशन केंद्राच्या अहवालातून पत्नीचे म्हणणे विश्वासार्ह दिसून आले.
Web Summary : Chhattisgarh HC rejected a husband's divorce plea after 35 years of marriage. Vague cruelty claims and the wife's reason for living with her daughter weren't sufficient grounds. The court emphasized the need for concrete evidence in long-term relationships.
Web Summary : छत्तीसगढ़ हाईकोर्ट ने 35 साल बाद पति की तलाक याचिका खारिज की। पत्नी बेटी के साथ रह रही थी, जिसे क्रूरता नहीं माना गया। कोर्ट ने कहा, पुराने रिश्ते में ठोस सबूत ज़रूरी हैं।