शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

35 साल बाद! नाराज वरूण गांधी धरणार राहुलचा 'हात', प्रियंका करणार मध्यस्थी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 12:56 IST

कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी लवकरच पक्षाची कमान सांभाळणार आहेत. दुसरीकडे राहुल गांधींचे चुलत भाऊ आणि भाजपा खासदार वरूण गांधी लवकरच कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार...

नवी दिल्ली : कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी लवकरच पक्षाची कमान सांभाळणार आहेत. दुसरीकडे राहुल गांधींचे चुलत भाऊ आणि भाजपा खासदार वरूण गांधी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी वरूण गांधी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. उत्तर प्रदेश निवडणुकांनंतर वरूण गांधी यांना मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते, पण त्यांना डावलून योगी आदित्यानाथ यांच्याकडे सुत्रं सोपवण्यात आली. तेव्हापासून वरूण नाराज असल्याचं वृत्त आहे. भाजपामध्ये वरूण गांधी यांना डावललं जात असल्याचं कॉंग्रेसचे ज्येष्ठ मुस्लिम नेता हाजी जमीलुद्दीन इंडिया टुडेसोबत बोलताना म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींव्यतिरिक्त भाजपाच्या कोणत्याही नेत्याला  ‘मन की बात’ करू दिली जात नाही. वरूण हे नेहमी त्यांची भूमिका सडेतोड मांडतात, त्यामुळे त्यांना पक्षात सातत्याने दुर्लक्षित केलं जातं. उत्तर प्रदेशात सत्ता आल्यानंतर भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी वरूण गांधींना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी केली होती , पण त्यांना डावलून योगी आदित्यनाथ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आलं, असं जमीलुद्दीन म्हणाले.  जमीलुद्दीन यांच्याशिवाय कॉंग्रेसचे दुसरे ज्येष्ठ नेता हाजी मंजूर अहमद यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकांआधी वरूण गांधी कॉंग्रस पक्षात प्रवेश करू शकतात असं म्हटलं आहे. प्रियंका गांधी आणि वरूण गांधी यांच्यातील संबंध चांगले आहेत, त्यामुळे वरूण गांधींच्या कॉंग्रेस प्रवेशात प्रियंका गांधी महत्वाची भूमिका बजावू शकतात, आणि  प्रियंका गांधींच्या समर्थनासह वरूण आणि राहुल गांधी यांचं स्थान पक्षात भक्कम करता येऊ शकते असं अहमद म्हणाले. जर वरूण यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला तर 35 वर्षानंतर नेहरू-गांधी कुटुंब पुन्हा एकत्र आलेलं पाहायला मिळेल.    

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीVarun Gandhiवरूण गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा