शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

35 दहशतवादी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 23:32 IST

सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ले करण्याची दहशतवाद्यांची योजना

नवी दिल्ली : काश्मीरमधील तणावपूर्ण परिस्थितीचा फायदा घेऊन 35 दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर विभागानं याबद्दलची माहिती केंद्र सरकारला दिली आहे. दहशतवादी गटागटानं काश्मीरच्या विविध भागांमध्ये घुसखोरी करु शकतात, अशी माहिती गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिली आहे. रमजानच्या काळात केंद्र सरकारनं दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई थांबवली आहे. मात्र या कालावधीत दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. याबद्दलचा अहवाल केंद्र सरकारला पाठवण्यात आला आहे. गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी चार गट करुन नियंत्रण रेषा ओलांडण्याच्या तयारीत आहेत. लष्कर-ए-तोयबाचे 18 दहशतवादी काश्मीरच्या कुपवाडामधील माछिल सेक्टरमध्ये घुसखोरी करु शकतात. हे दहशतवादी दोन गटांच्या माध्यमातून घुसखोरी करुन लष्कराच्या तळांना लक्ष्य करु शकतात. याशिवाय लष्कर-ए-तोयबाचे 8 दहशतवादी नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरी करु शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूंछ सेक्टरमध्ये सहा दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करु शकतात. गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर या दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यात अपयश आलं, तर ते आयईडीचा स्फोट घडवू शकतात. पूंछमधील बिजी सेक्टरमध्ये 3 दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न होऊ शकतो. घुसखोरी करुन सुरक्षा दलांकडून शस्त्रं चोरण्याची योजना दहशतवाद्यांनी आखली आहे. काश्मीरमधील तणावपूर्ण वातावरणात भर घालण्याचा दहशतवाद्यांचा मानस आहे.  

टॅग्स :terroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरRamzanरमजानNarendra Modiनरेंद्र मोदी