शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

ऑनलाइन गेममध्ये जिंकले ३.५ लाख, मात्र काही दिवसांतच संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 11:57 IST

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे एका तरुणाने ऑनलाइन गेम्सच्या माध्यमातून साडे तीन लाख रुपये जिंकले होते. मात्र हेच साडेतीन लाख रुपये या तरुणाच्या मृत्यूचं कारण ठरलं.

मागच्या काही काळात ऑनलाइन गेम्सचं प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये या ऑनलाइन गेम्समधील विजेत्याबरोबर धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे एका तरुणाने ऑनलाइन गेम्सच्या माध्यमातून साडे तीन लाख रुपये जिंकले होते. मात्र हेच साडेतीन लाख रुपये या तरुणाच्या मृत्यूचं कारण ठरलं. त्याचं झालं असं की, या तरुणाने जिंकलेले साडे तीन लाख रुपये हडपण्यासाठी गावातील काही गावगुंडांनी त्याला त्रास देण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून या तरुणाने अखेर गळफास लावून जीवन संपवले. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, पोलीस पुढील तपास करत आहे.

ही घटना अमेठीमधील मुंशीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सरायखेमा गावात घडली आहे. येथे राहणाऱ्या राकेश यादव नावाच्या तरुणाने काही दिवसांपूर्वी  ऑनलाइन अॅपवरील गेममध्ये ३ लाख ५५ हजार रुपये जिंकले होते. ही रक्कम जिंकल्यानंतर गावातील काही गुंडांनी त्याला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे हा तरुण त्रस्त होता.मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा राकेश यादव काही दिवसांपूर्वी मोबाईलवरील ऑनलाईन गेम्समध्ये जिंकला होता. त्याने या खेळात जिंकलेल्या पैशांचं वृत्त हे गावभर पसरलं होतं. तसेच ही बाब गावातील काही गावगुंडांना समजताच त्यांनी पैसे हडप करण्याच्या बहाण्याने राकेश याला त्रास देण्यास सुरुवात केली. दरडावून धमकावून त्यांनी त्याच्याकडून ५५ हजार रुपये उकळले. मात्र या गावगुंडांचं तेवढ्यावर समाधान झालं नाही. त्यांनी आणखी पैसे मागण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्रस्त होऊन राकेशने अखेर त्याचं जीवन संपवलं.  

दरम्यान, मृत राकेशची आई शांती देवी यांनी मुंशीगंज पोलीस ठाण्यात तक्रार देताना सांगितले की, माझ्या मुलाने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन गेम्समध्ये साडे तीन लाख रुपये जिंकले  होते. त्यानंतर गावातीलच अनुराग जयसवाल, तुफान सिंह, विशाल सिंह आणि हंसराज मौर्य  त्याला त्रास देऊ लागले होते. ते नेहमी राजेशला मारहाण करायचे. तसेच त्याचाकडून पैसे हिसकावून घ्यायचे. दरम्यान, काल रात्रीही त्यांनी राजेशला त्रास दिला. त्यामुळे वैतागून अखेर राजेशने जीवन संपवलं, असा दावा त्याच्या आईने केला.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश