३१ उपग्रहांचे होणार एकाच वेळी प्रक्षेपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 04:08 IST2017-12-30T04:08:18+5:302017-12-30T04:08:50+5:30
बंगळुरू : ‘पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल’ (पीसएलव्ही) या शक्तिशाली अग्निबाणाने येत्या १० जानेवारी रोजी भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) तब्बल ३१ उपग्रह एकाच वेळी अंतराळात सोडणार आहे.

३१ उपग्रहांचे होणार एकाच वेळी प्रक्षेपण
बंगळुरू : ‘पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल’ (पीसएलव्ही) या शक्तिशाली अग्निबाणाने येत्या १० जानेवारी रोजी भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) तब्बल ३१ उपग्रह एकाच वेळी अंतराळात सोडणार आहे.
या मोहिमेसाठी पीएसएलव्ही-सी ४० हा अग्निबाण वापरला जाईल. यात सोडल्या जाणा-या उपग्रहांमध्ये भारताचा ‘कार्टोसॅट-२’ मालिकेतील पृथ्वीचे निरीक्षण करणारा उपग्रह हा मुख्य व सर्वात मोठा उपग्रह असेल. याखेरीज भारताचे दोन लघू व एक अतिलघू उपग्रहही या वेळी सोडले जातील. इतर २८ लघू उपग्रह फिनलॅण्ड व अमेरिकेसह इतर देशांचे असतील. गेल्या आॅगस्टमध्ये अशाच प्रकारच्या अग्निबाणाने ‘आयआरएनएसएस-१ एच’ उपग्रह सोडण्याची मोहीम अपयशी ठरली होती. (वृत्तसंस्था)