शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

कोरोना परतीच्या वाटेवर? एका दिवसात केवळ १४,१४६ नवे रुग्ण; ३० टक्के नागरिकांचे लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 10:23 AM

देशात सद्यस्थितीत केवळ ३० टक्के नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. त्यामुळे काेराेनाविरुद्ध आपले युद्ध सुरूच असून, काेणत्याही प्रकारची ढील देऊ नका, असा सल्लावजा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

नवी दिल्ली : देशात रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात कोरोनाचे नवे १४,१४६ रुग्ण आढळले तर १४४ जणांचा मृत्यू झाला. देशात कोरोनामुळे आतापर्यंत मरण पावलेल्यांची एकूण संख्या ४,५२,१२४ झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. देशात लसीकरणाची १०० काेटी डाेसकडे वाटचाल सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी हाेताना दिसत आहे. मात्र, अधूनमधून रुग्णसंख्या वाढत असल्याचेही आढळते. देशात सद्यस्थितीत केवळ ३० टक्के नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. त्यामुळे काेराेनाविरुद्ध आपले युद्ध सुरूच असून, काेणत्याही प्रकारची ढील देऊ नका, असा सल्लावजा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या १,९५,८४६ असून एकूण बाधितांच्या संख्येत हे प्रमाण ०.५७ टक्के तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१० टक्के आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत गेल्या २४ तासात ५,७८६ ने घट झाली. देशव्यापी मोहिमेत आतापर्यंत ९७.६५ कोटी कोविड लस मात्रा दिल्या गेल्या आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.शनिवारी ११,००,१२३ चाचण्या केल्या गेल्या. त्यामुळे देशात एकूण चाचण्यांची संख्या ५९,०९,३५,३८१ झाल्या. कोरोनातून आतापर्यंत ३,३४,१९,७४९ लोक बरे झाले असून रुग्ण मरण पावण्याचा दर हा १.३३ टक्के आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने २० लाखांचा टप्पा ७ ऑगस्ट, २०२० रोजी पूर्ण केला होता. ३० लाखांचा २३ ऑगस्ट, ४० लाखांचा ५ सप्टेंबर तर १६ सप्टेंबर, २०२० रोजी ५० लाखांची पायरी ओलांडली होती. ६० लाखांचा टप्पा २८ सप्टेंबर, ७० लाखांचा ११ ऑक्टोबर, ८० लाखांचा टप्पा २९ ऑक्टोबर, ९० लाखांचा २० नोव्हेंबर आणि एक कोटींचा टप्पा १९ डिेसेंबर रोजी ओलांडला होता. यावर्षी ४ मे रोजी २ कोटींचा टप्पा पार केला.देशात १८ वर्षांखालील मुलांच्या काेराेना लसीकरणाबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत संशाेधनातील निष्कर्ष आणि लसींच्या साठ्याची उपलब्धता याबाबत विचार करून परवानगी देण्यात येईल. - व्ही. के. पाॅल, काेविड टास्क फाेर्सचे प्रमुख  ’अधिक सवलतीबाबत निर्णय दिवाळीनंतर’ जालना : लसीचा एक डोस घेतल्यानंतर नागरिकांना मॉल प्रवेश, रेल्वे प्रवासाची सवलत देण्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतर आरोग्य विभाग व टास्क फोर्सशी चर्चा करून मुख्यमंत्री घेतील. दिवाळीनंतर आढळणारी बाधितांची संख्या व सेतू ॲपमध्ये व्यक्तीचे स्टेटस सेफ असणे गरजेचे असेल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. धोका टळलेला नाही भारतात १८ वर्षांवरील सुमारे ७० काेटी नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक लसीचा पहिला डाेस घेतला आहे, तर २८ काेटी नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. हे प्रमाण अनुक्रमे ७३ आणि ३० टक्के आहे. संपूर्ण लसीकरण झालेल्यांची संख्या कमीच असल्याने हे युद्ध संपलेले नसून काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काेविड टास्क फाेर्सचे प्रमुख व्ही. के. पाॅल यांनी सांगितले की, अनेक देशांमध्ये दाेनपेक्षा अधिक काेराेनाच्या लाटा आढळून आल्या आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या कमी हाेत असली तरीही वाईट काळ संपला आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. भीती घालविण्यासाठी खेर यांचे विशेष गाणे कोरोना-१९ विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या लसीबद्दल पसरलेल्या चुकीच्या कल्पना नाहीशा व्हाव्यात म्हणून गायक व संगीतकार कैलाश खेर यांनी बनवलेले गीत केंद्र सरकारने शनिवारी जारी केले. ३.३० मिनिटांचे हे गीत आणि व्हिडिओ दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी आणि रामेश्वर तेली यांच्या उपस्थितीत खुले करण्यात आले. या गीतामुळे लसीबद्दलची नकाराची भावना नाहीशी होईल आणि लस देशाला सुरक्षित राखेल, असे हरदीप सिंग पुरी यांनी ट्वीटवर म्हटले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या