संतापजनक ! 3 वर्षांच्या मुलीच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेऊन पेटवला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 14:58 IST2018-11-08T11:41:56+5:302018-11-08T14:58:31+5:30
संतापजनक आणि चीड आणणारी घटना मेरठमध्ये घडली आहे. एक तीन वर्षांची मुलगी फटाक्यांमुळे गंभीर जखमी झाली आहे.

संतापजनक ! 3 वर्षांच्या मुलीच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेऊन पेटवला...
मेरठ : संतापजनक आणि चीड आणणारी घटना मेरठमध्ये घडली आहे. एक तीन वर्षांची मुलगी फटाक्यांमुळे गंभीर जखमी झाली आहे. दिवाळीच्या एक दिवसापूर्वी ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मुलानं तिच्या तोंडामध्ये सुतळी बॉम्ब ठेवला आणि तो पेटवला, बॉम्ब तोंडात फुटल्यानं मुलगी गंभीर जखमी झाली आहे. यानंतर तिला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मिलक गावातील ही घटना आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली असून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. मुलीचे वडील शशी कुमार यांना हरपाल नावाच्या युवकाविरोधात तक्रार केल्याचं म्हटलं जात आहे. पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना हरपालनं तिच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेवला आणि पेटवला. यात चिमुकलीला गंभीर दुखापत झाली आहे. मुलीला तब्बल 50 टाके पडले आणि घशालाही इजा झाली आहे.
Meerut: Woman allege that her three-year-old daughter is injured after a youth had set off fire crackers inside her mouth yesterday. Doctor says,"Her tongue has a cut, her checks have burn marks and there are dust particles inside her mouth." pic.twitter.com/V5xIPOOjmb
— ANI UP (@ANINewsUP) November 8, 2018