काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 04:36 IST2025-05-14T04:36:02+5:302025-05-14T04:36:32+5:30
अतिरेक्यांच्या हालचालींबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर जंगलांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली.

काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू : दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात केल्लरच्या शुकरू वन क्षेत्रात मंगळवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. अतिरेक्यांच्या हालचालींबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर जंगलांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली.
ठार झालेल्या दुसऱ्या अतिरेक्याची ओळख पटली असून, अदनान शफी डार असे त्याचे नाव आहे. तिसऱ्या अतिरेक्याची ओळख पटवली जात आहे. चकमकीत लष्करचा ऑपरेशनल चीफ कमांडर शाहिद कुट्टे याच्यासह दोन जण ठार करण्यात आले. चोटीपोरा हीरपोराचा तो रहिवासी होता व मोस्ट वाँटेड अतिरेक्यांपैकी एक होता. तो ८ मार्च २०२३ रोजी अतिरेकी गटात सामील झाला होता व अनेक घातपातांमध्ये त्याचा हात होता.